जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केले असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल. ते तिच्या पोटात जाईल आणि तिला खुप त्रास होईल. तिच्या पोटात मूल असेल तर तें जन्मण्याआधीच मरेल आणि तिला कधीही मुले होणार नाहीत. सर्व लोक तिला शाप देतील.
Cross references
परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरुद्ध पाप केले असेल - तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू शुद्ध नाहीस.
तुमच्यावर येणारी संकटे पाहून तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा तुम्ही विषय व्हाल.
देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर.
शाप हेच त्याचे कपडे असू दे. शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे. शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.
पण शेवटी त्यामुळे कटुता व दु:खच मिळेल. ते दु:ख विषापेक्षाही कडवट असले. आणि तलवारीपेक्षी धारदार असेल.
मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापव्व्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखव्व्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.
माझ्या सेवकांना तुमची नावे शिव्यांसारखी वाटतील.” परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला ठार मारील तो त्याच्या सेवकांना मात्र नव्या नावाने बोलावील.
“मी त्यांना शिक्षा करीन. त्या शिक्षेने पृथ्वीवरील सर्व लोकांना धक्का बसेल. यहूदातील ह्या लोकांची इतर लोक चेष्टा करतील लोक एकमेकांना त्यांच्याबद्दलचे विनोदी किस्से सांगतील. मी त्यांना जेथे पाठवीन, तेथे तेथे लोक त्यांना शाप देतील.
मी अजूनही यरुशलेममध्ये राहत असलेल्या लोकांचा लढाई, उपासमार व भयंकर रोगराई ह्यांनी पाठपुरावा करीन. ह्यामुळे लोकांची जी स्थिती होईल ती जगातील राज्यांचा भीतीने थरकाप उडवेल. ज्या राष्ट्रांत जायला त्यांना मी भाग पाडीन, तेथे तेथे त्यांच्याकडे एक शाप म्हणून पाहिले जाईल. ह्या लोकांची स्थिती पाहून ते विस्मयाने सुस्करे सोडतील.
यहूदी कैदी दुसऱ्याचे वाईट चिंततांना त्या दोघांच्या नावाचा उदाहरण म्हणून उपयोग करतील. ते म्हणतील, ‘सिद्कीया व अहाब यांच्याप्रमाणे परमेश्वर तुमचे वाईट करो! बाबेलच्या राजाने त्या दोघांना जाळले.’
“मग सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव पुढे म्हणतो, ‘मी यरुशलेमवरचा माझा राग व्यक्त करुन दाखविला. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना मी शिक्षा केली. त्याचप्रमाणे मिसरमध्ये जाणाऱ्या प्रत्येकावर मी राग प्रकट करीन. दुसऱ्यांना शाप देताना लोक उदाहरण म्हणून तुमचे नाव घेतील. तुम्ही म्हणजे जणू शिवी व्हाल. लोकांना तुमची लाज वाटेल, लोक तुमचा अपमान करतील, तुम्हाला पुन्हा कधीही यहूदा दिसणार नाही.’
यहूदातील अगदी थोडे लोक वाचले आहेत. ते येथे मिसरला आले आहेत. पण यहूदातील कुळातल्या त्या वाचलेल्या लोकांचा मी नाश करीन. अती महत्वाच्या व्यक्तीपासून अती सामान्यपर्यंत सर्वच्या सर्व युद्धात ठार होतील वा उपासमारीने मरतील. इतर राष्ट्रांतील लोक त्यांची निंदा करतील. त्या लोकांच्या बाबतीत जे घडले, ते पाहून इतर राष्ट्रांतील लोक घाबरतील. ते लोक म्हणजे जणू काय शिवी बनतील, दुसरी राष्ट्रे त्यांचा अपमान करतील.
शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशीर्वचन बनतील तेव्हा घाबरु नका! सामर्थ्यवान. व्हा!”
आणि त्यावेळेला तुम्हांला काय फळ मिळाले, त्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे.
हरवलेल्यांसाठी आम्ही मरणाचा वास आहोत तर जे तारले गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे?
सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.
विशेषत: जे पापमयवासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोकगौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत.