मी अजूनही यरुशलेममध्ये राहत असलेल्या लोकांचा लढाई, उपासमार व भयंकर रोगराई ह्यांनी पाठपुरावा करीन. ह्यामुळे लोकांची जी स्थिती होईल ती जगातील राज्यांचा भीतीने थरकाप उडवेल. ज्या राष्ट्रांत जायला त्यांना मी भाग पाडीन, तेथे तेथे त्यांच्याकडे एक शाप म्हणून पाहिले जाईल. ह्या लोकांची स्थिती पाहून ते विस्मयाने सुस्करे सोडतील.
Cross references
परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमचा नायनाट करीन; तुमचा देश ओसाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.
“शत्रू तुम्हांला पराभूत करतील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.
परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.
“पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस,
म्हणून यहूदा यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांना शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हांला माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात.
तू आम्हाला मेंढ्यासारखे खायचे अन्न म्हणून देऊन टाकले. तू आम्हाला राष्ट्रांमध्ये इतस्तता विखरुन टाकले.
माझ्या सेवकांना तुमची नावे शिव्यांसारखी वाटतील.” परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला ठार मारील तो त्याच्या सेवकांना मात्र नव्या नावाने बोलावील.
पृथ्वीवरच्या सर्व लोकांना, एखाद्या भयंकर गोष्टीसाठी देण्याचे उदाहरण म्हणून मी यहूदाच्या लोकांचा उपयोग करीन. मनश्शेने यरुशलेममध्ये जे काय केले, त्यासाठी मी यहूदातील लोकांना शिक्षा करीन. कारण मनश्शे हा हिज्कीया राजाचा मुलगा व यहूदाचा राजा होता.’
म्हणून यहूदाचा देश म्हणजे एक निर्जन वाळवंट होईल. ह्या देशाच्या जवळून जाताना, प्रत्येकवेळी लोक धक्क्याने मान हलवून नि:श्वास सोडतील. ह्या देशाचा, अशा रीतीने, नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.
ह्या नगरीचा मी पूर्णपणे नाश करीन. यरुशलेम जवळून जाताना लोक निराशेने माना हलवतील व सुस्कारे सोडतील अशा तऱ्हेने नगरीचा नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.
“मी त्यांना शिक्षा करीन. त्या शिक्षेने पृथ्वीवरील सर्व लोकांना धक्का बसेल. यहूदातील ह्या लोकांची इतर लोक चेष्टा करतील लोक एकमेकांना त्यांच्याबद्दलचे विनोदी किस्से सांगतील. मी त्यांना जेथे पाठवीन, तेथे तेथे लोक त्यांना शाप देतील.
मी त्यांच्यावर लढाई, उपासमार आणि रोगराई ह्या आपत्ती पाठवीन. ते सर्व ठार होईपर्यंत मी त्यांच्यावर हल्ला करीन. मग मी त्यांना आणि त्याच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर ते अजिबात शिल्लक राहणार नाहीत.”
म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील.
तुम्ही माझे ऐकले नाही तर मी माझे यरुशलेममधील मंदिर शीलोमधील माझ्या पवित्र तंबूप्रमाणेकरीन दुसऱ्या शहरांवर अरिष्ट यावे असे वाटणाऱ्या लोकांना यरुशलेम जरुर आठवेल.”
यहूदी कैदी दुसऱ्याचे वाईट चिंततांना त्या दोघांच्या नावाचा उदाहरण म्हणून उपयोग करतील. ते म्हणतील, ‘सिद्कीया व अहाब यांच्याप्रमाणे परमेश्वर तुमचे वाईट करो! बाबेलच्या राजाने त्या दोघांना जाळले.’
“म्हणून परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही. तुम्ही तुमच्या इब्री गुलामांना स्वातंत्र्य दिले नाही. तुम्ही कराराचे पालन केले नाही, म्हणून आता ‘मी “स्वातंत्र्य” देईन. हा परमेश्वराचा संदेश आहे. युद्धात, भयंकर रोगराईने अथवा उपासमारीने मरण्याचे “स्वातंत्र्य” (मी तुम्हाला देईन) मी तुमच्याबाबतीत असे काहीतरी करीन की त्याबद्दल ऐकून पृथ्वीवरची राज्ये भीतीने चळाचळा कापतील.
“मग सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव पुढे म्हणतो, ‘मी यरुशलेमवरचा माझा राग व्यक्त करुन दाखविला. यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांना मी शिक्षा केली. त्याचप्रमाणे मिसरमध्ये जाणाऱ्या प्रत्येकावर मी राग प्रकट करीन. दुसऱ्यांना शाप देताना लोक उदाहरण म्हणून तुमचे नाव घेतील. तुम्ही म्हणजे जणू शिवी व्हाल. लोकांना तुमची लाज वाटेल, लोक तुमचा अपमान करतील, तुम्हाला पुन्हा कधीही यहूदा दिसणार नाही.’
रस्त्यावरून जाणारे तुला पाहून हादरतात व हळहळतात. यरुशलेमच्या कन्येकडे बघून ते चुकचुकतात. ते विचारतात, “लोक जिला “सौंदर्यपूर्ण नगरी” अथवा “पृथ्वीवरचा आनंद म्हणतात, ती नगरी हीच का?””
तुझ्या आजूबाजूचे लोक जशी तुझी चेष्टा करतील, तसेच तुझ्यावरुन ते धडाही घेतील. मी रागावलो आणि तुला शिक्षा केली हे ते पाहतील. मी खूपच संतापलो होतो. मी तुला ताकीद दिली. मी परमेश्वर, काय करणार आहे, ते तुला सांगितले होते.
देव म्हणाला, “तुमच्यातील काही लोकांना मी निसटू देईन. ते दुसऱ्या देशांत थोड्या काळाकरिता राहतील. मी त्यांना विखरुन टाकीन आणि दुसऱ्या देशांत राहायला भाग पाडीन.
मग त्या लोकांना मीच देव आहे हे कळेल. मीच त्यांना राष्ट्रां - राष्ट्रांतून विखुरले हे त्यांना कळून चुकेल. मी त्यांना सक्तीने दुसऱ्या देशांत जायला लावले, हे त्यांना समजेल.
मी तुम्हाला राष्ट्रां-राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन. मी तुम्हाला वेगवेगळ्या देशांत सक्तीने पाठवीन. ह्या नगरीतील अमंगळ गोष्टींचा मी संपूर्ण नाश करीन.
मी त्यांना राष्ट्रा-राष्ट्रांत पसरविले आणि सर्व जगात विखरुन टाकले. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना अशीच शिक्षा केली.
इस्राएल राष्ट्रांच्या नाशाची आज्ञा मी देत आहे. सर्व राष्ट्रांमध्ये मी इस्राएलच्या लोकांना पांगवीन. पण पीठ चाळण्यासारखे ते असेल. चाळणीतील पीठ हलविल्यावर, चांगले पीठ खाली पडते. व चाळ चाळणीतच राहते. याकोबच्या घराण्याचे तसेच होईल.
एखाद्या झंझावाताप्रमाणे मी इतर राष्ट्रांना त्यांच्याविरुध्द उठवीन. ज्या राष्ट्रांची त्यांना माहिती नव्हती, अशी राष्ट्रे देशावर आक्रमण करुन त्यांचा नाश करतील आणि हे प्रसन्न राष्ट्र नाश पावेल.”
शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशीर्वचन बनतील तेव्हा घाबरु नका! सामर्थ्यवान. व्हा!”
ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करुन राष्ट्रांत नेतील आणि यहूदीतर लोकांचा काळ संपेपर्यंत यहूदीतर राष्ट्रे यरुशलेम पायाखाली तुडवतील.