Home Bibles यशया 65:15 · मराठी बायबल
यशया 65:15 · मराठी बायबल

माझ्या सेवकांना तुमची नावे शिव्यांसारखी वाटतील.” परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला ठार मारील तो त्याच्या सेवकांना मात्र नव्या नावाने बोलावील.

Cross references

नीतिसूत्रे 10:7

चांगली माणसे चांगल्या आठवणी मागे ठेवतात. पण वाईट माणसे लवकर विसरली जातात.

यशया 62:2

मग सगळी राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील. सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील मग तुला नवे नाव मिळेल. परमेश्वर स्वत:तुला नवे नाव ठेवील.

यशया 65:9

मी याकोबच्या (इस्राएलच्या) काही लोकांना ठेवीन. यहूदातील काही लोकांना माझा डोंगर मिळेल. माझे सेवक तेथे राहतील. तेथे राहण्यासाठी मी लोकांची निवड करीन.

यशया 65:12

पण मी तुमचे भविष्य ठरवितो. आणि मी तुम्हाला तलवारीने मारायचे ठरविले आहे. तुम्ही सर्व मारले जाल का? कारण मी तुम्हाला बोलाविले आणि तुम्ही मला ओ द्यायचे नाकारले. मी तुमच्याशी बोललो पण तुम्ही माझे ऐकले नाही. मी ज्यांना पापे म्हणतो, त्या गोष्टी तुम्ही केल्या. मला आवडत नसलेल्या गोष्टी करायचे तुम्ही ठरविले.”

यशया 65:22

एकाने घर बांधायचे व त्यात दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्ष मळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. माझे लोक वृक्षांएवढे जगतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.

यशया 66:15

पाहा! परमेश्वर अग्नी घेऊन येत आहे. परमेश्वराचे सैन्य धुळीचे लोट उडवीत येत आहे. आपल्या रागाचा उपयोग परमेश्वर लोकांना शिक्षा करण्यासाठी करील. परमेश्वर रागावल्यावर त्या लोकांना अग्नीच्या ज्वाळांनी शिक्षा करील.

यिर्मया 29:22

यहूदी कैदी दुसऱ्याचे वाईट चिंततांना त्या दोघांच्या नावाचा उदाहरण म्हणून उपयोग करतील. ते म्हणतील, ‘सिद्कीया व अहाब यांच्याप्रमाणे परमेश्वर तुमचे वाईट करो! बाबेलच्या राजाने त्या दोघांना जाळले.’

जखऱ्या 8:13

शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशीर्वचन बनतील तेव्हा घाबरु नका! सामर्थ्यवान. व्हा!”

मत्तय 21:41

यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”

मत्तय 22:7

राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.

प्रेषितांचीं कृत्यें 11:26

जेव्हा बर्णबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले. शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना ‘ख्रिस्ती’ हे नाव पहिल्यांदा मिळाले.

रोमकरांस 9:26

“आणि असे होईल की, जेथे ‘तुम्ही माझे लोक नाहीत’ असे म्हटले, होते तेथे त्यांना जिवंत देवाची मुले म्हणण्यात येईल.”

1 थेस्सलनीकाकरांस 2:16

यहूदीतर लोकांचे तारण होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायला हवे, परंतु ते आम्हांला मना करुन एक प्रकगरे पापच करीत आहेत. ते या पापाद्वारे जे ते नेहमी करीत आले आहेत आपल्या पापाचे माप भरत आले आहेत. आणि आता शेवटी आणि पूर्णतेने देवाचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे.

1 पेत्र 2:9

पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.

Interlinear

Choose Theme