आणि त्यावेळेला तुम्हांला काय फळ मिळाले, त्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे.
Cross references
त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका.
“एखाद्याचा अपराध मुत्युदंड मिळण्याइतका मोठा असेल. अशावेळी त्याच्या देहान्ता नंतर लोक त्याचे प्रेत झाडाला टांगतील.
दावीदाला या श्रीमंत माणसाचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, “परमेश्वराची शपथ, या माणसाला प्राणदंड मिळाला पाहिजे
मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्याघरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडीलांबरोबर मार्गक्रमण करताना परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू त्यांना साथ दिली आहेस”
तेव्हा मी ही प्रार्थना केली:हे परमेश्वरा, तुझ्याकडे पाहायाची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोचले आहेत.
“मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
आणि परमेश्वरा आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चात्ताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून माझे मन आणि माझे आयुष्य बदलण्याचे वचन देत आहे.”
मी देवाच्या मंदिरात गेलो आणि नंतर मला कळले.
म्हणून आता तुम्ही तुमच्या मार्गाने चला. तुम्ही तुमच्या वाईट मार्गाने जीवन जगलात म्हणून तुम्ही तुमचा सर्वनाश करुन घेणार आहात.
तुम्हाला माहीत नसलेले लोक तुमची संपत्ती संपत्ती घेतील. तुम्ही ज्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट केलेत त्या गोष्टी ते लोक घेतील.
पण ती (मूर्खता) म्हणते, “जर तुम्ही पाणी चोरले तर ते पाणी तुमच्या पाण्यापेक्षा अधिक चवदार लागते. जर तुम्ही भाकर चोरली तर ती तुम्ही केलेल्या भाकरीपेक्षा अधिक चवदार लागते.”
लोकांना वाटत असते हाच मार्ग बरोबर आहे. पण तो मार्ग फक्त मरणाकडे नेतो.
एखादा मार्ग लोकांना योग्य वाटतो. पण तो मार्ग मृत्यूकडे नेतो.
सज्जनांना सांगा की त्यांचा उत्कर्ष होईल. सत्कृत्यांचे फळ त्यांना मिळेल.
पाप केलेस म्हणून पाऊस पडला नाही. वळवाचा पाऊस तर अजिबात पडला नाही. पण तरी तुला लाज वाटत नाही. वारांगनेप्रमाणे तुझ्या तोंडावर निर्लज्जपणाचे भाव आहेत. तू तुझ्या कृत्यांबद्दल शरमिंदी होत नाहीस.
संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे. पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही. म्हणून बाकीच्यांबरोबर त्यांना शिक्षा होईल. मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील. परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
लोकांनी गहू पेरला, तर तिथे काटे उगवतील. लोक दमेपर्यंत खूप कष्ट करतील, पण या अफाट मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही. त्यांच्या पिकाबाबत ते खजिल होतील. परमेश्वराच्या कोपामुळे या गोष्टी घडतील.”
पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने, मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो. प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो.
परमेश्वरा, मी तुझ्यापासून भटकले होते. पण मी केलेली पापे मला कळली, म्हणून मी माझे मन आणि जीवन बदलले. मी तरुण असताना केलेल्या मूर्खपणाच्या गोष्टींची मला लाज वाटते. त्यामुळे मला ओशाळे वाटते.”
मग ह्या सर्व गोष्टी सांगणाऱ्या स्त्री पुरुषांशी यिर्मया बोलला
मी तुझ्या बहिणींना तुझ्याकडे आणीन आणि त्यांना तुझ्या मुली करीन. हे आपल्या करारात नव्हते, पण मी हे तुझ्यासाठी करीन. मग तुला तुझ्या दुष्कृत्यांचे स्मरण होऊन लाज वाटेल.
तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी तुम्हाला आठवतील. त्या गोष्टी चांगल्या नव्हत्या, हे तुम्हाला स्मरेल. मग तुम्ही केलेल्या पापाबद्दल आणि भयानक कृत्यांबद्दल स्वत:चाच तिरस्कार कराल.”
मग त्यांना, स्वत: केलेल्या वाईट कृत्यांची लाज वाटेल. त्यांना मंदिराच्या रचनेबद्दल कळू दे. ते कसे बांधले आहे, प्रवेशद्वारे व बाहेर पडण्याची दारे कोठे आहेत, सर्व नक्षीकाम कसे आहे ह्याबद्दल त्यांना समजू दे. त्यांना मंदिराबद्दलचे सर्व विधिनियम शिकव. हे सर्व तू लिहून ठेव म्हणजे सर्वजण ते पाहू शकतील. मग ते मंदिराबाबतचे सर्व विधिनियम पाळतील. ते ह्या गोष्टी करु शकतील.
“परमेश्वरा, तू फार चांगला आहेस. आणि चांगुलपणा तुझ्यातच आहे. पण आज आमच्याकडे फक्त अप्रतिष्ठा आहे. आणि यरुशलेमच्या लोकांजवळ फक्त अपमान आहे. इस्राएलच्या लोकांजवळ मग ते जवळ असोत की लांब अपमानाखेरीच काही नाही. परमेशवरा, तू त्या लोकांना पुष्कळ राष्ट्रांत विखरून टाकलेस आणि अशा, सर्व राष्ट्रांत राहाणाऱ्य, इस्राएलच्या लोकांना लाज वाटायला पाहिजे. परमेश्वरा तुझ्याविरुध्द केलेल्या वाईट कर्मामुळे त्यांना शरम वाटायला पाहिजे.
पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल.
नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, “माझ्या पित्याच्या घरी किती तरी मजुरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे!
देवाच्या नितिमत्वाचा जो नियम सांगतो की, जे लोक असे वागतात ते मरणास योग्य आहेत असे जरी त्यांना माहीत होते तरी ते त्या गोष्टी करतात इतकेच नव्हे तर जे असे करतात त्यांना मान्यताही देतात.
कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.
कारण जेव्हा आम्ही आमच्या पापी मानवी स्वभावाप्रमाणे जगत होतो तेव्हा पापी वासना नियमशास्त्राच्या द्वारे मरणाला फळ देण्यासाठी आपल्या अवयवामध्ये कार्य करीत होत्या.
देहाचे चिंतन हे मरण आहे. पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांति आहे.
कारण जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात, परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल.
पहा दैवी दु:खामुळे तुमच्यात काय निर्माण झाले आहे: किती तरी गंभीरपणा आणि आत्मियता, स्वत:ला स्पष्ट करण्यासाठी किती उत्सुकता, किती संताप, किती सावधानता, किती ओढ, किती सदिच्छा व न्याय मिळवून देण्यासाठी किती तत्परता, या बाबतीत प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वत:ला निर्दोष असे सिद्ध केले.
तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल.
नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आहे आणि त्यांच्या निर्लज्जपणामध्ये त्यांचे गौरव आहे ते फक्त ऐहिक गोष्टीविषयीच विचार करतात.
पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिति असते; तिचा अग्नीने नाश होईल.
तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा!
मनात वासना निर्माण झाली की, तिच्या पोटी पापाचा जन्म होतो व पापाची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा ते मरणाला जन्म देते.
तो त्याचा जीव मरणाच्या दाढेतून सोडवितो. आणि त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा होते.
कारण देवाच्या घराण्यापासून सुरुवात करुन न्यायनिवाडा व्हावा अशी वेळ आली आहे. आणि त्याचा आरंभ पहिल्यांदा आपल्यापासून होईल, तर देवाच्या सुवार्तेचा सन्मान करण्याचे जे नाकारतील त्या लोकांचा शेवट कसा होईल बरे?
म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हांला दृढविश्वासमिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.