Home Bibles इब्री लोकांस 10:26 · मराठी बायबल
इब्री लोकांस 10:26 · मराठी बायबल

सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.

Cross references

लेवीय 4:2

“इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वराने मना केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले वा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात:

लेवीय 4:13

“इस्राएलच्या सर्व राष्ट्राकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केले तर ते सर्वजण दोषी ठरतील.

गणना 15:28

याजक त्या माणसाला शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी करील. त्या माणसाने चूक केली आणि परमेश्वरापुढे पाप केले. पण याजकाने त्याला शुद्ध केले तर त्याला क्षमा केली जाईल.

अनुवाद 17:12

“जो याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्याला चांगले शासन करा. त्याला मृत्युदंड द्या. इस्राएलमधून या नीच माणसाचे उच्चाटन करा.

स्तोत्रसंहिता 19:12

कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत. म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.

दानीएल 5:22

पण बेलशस्सर, तुला हे सर्व ठाऊकच आहे तू नबुखद्नेस्सरचा नातूचआहेस पण अजूनही तू नम्र झाला नाहीस.

मत्तय 12:31

म्हणून मी तुम्हांला सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची क्षमा करण्यात येईल. ते जे काही वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्याला क्षमा करण्यात येणार नाही.

मत्तय 12:43

“जेव्हा अशुद्ध आत्मा माणसाला सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्याला मिळत नाही.

लूक 12:47

ज्या नोकराला आपल्या मालकाची इच्छा माहीत असते व जो तयार राहत नाही, किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.

योहान 9:41

येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच आंधळे (समज नसलेले) असता, तर तुम्ही पापाबद्दल दोषी ठरला नसता. परंतु ‘आम्हांस दिसते’ असे तुम्ही म्हणता (तुम्ही काय करता हे जाणता) म्हणून तुम्ही दोषी आहात.”

योहान 13:17

या गोष्टी जर तुम्ही समजता आणि त्या तुम्ही जर केल्या तर तुम्ही आशीर्वादित आहात.

योहान 15:22

जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापबद्धल दोषी ठरले नसते. आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही.

2 थेस्सलनीकाकरांस 2:10

आणि जे नरकाच्या वाटेवर आहेत त्यांच्याविरुद्ध प्रत्येक प्रकारची दुष्टता फसवणूक व्हावी म्हणून तो आणील, कारण त्यांनी सत्यावर प्रेम करण्याचे नाकारले. यासाठी की त्यांचे तारण होणे शक्य व्हावे.

1 तीमथ्याला 1:13

जरी मी पूर्वी निंदा करणारा, मनस्ताप देणारा आणि हिंसक होतो, तरी माझ्यावर दया दाखविण्यात आली. तोर्पांत मी विश्वासणारा नव्हतो म्हणून अज्ञानामुळे मी तसा वागलो.

इब्री लोकांस 6:4

ज्यांना स्वर्गीय दानांचा अनुभव आलेला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, त्यांना पुन्हा पश्चात्तापाकडे नेणे अशक्य आहे.

याकोब 4:17

म्हणून जर तुम्हांला चांगले कसे करायचे हे माहीत असूनही जर ते तुम्ही करीत नाही, तर तुम्ही पाप करता.

2 पेत्र 2:20

म्हणून आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त यांची ज्या लोकांना ओळख होते,त्यांची जगाच्या दूषित वातावारणापासून सुटका होते. परंतु नंतर पुन्हा एकदा जगाचे अशुद्ध वातावरण या लोकांवर आपलापगडा बसविते. मग त्यांची शेवटची स्थिती अगोदरच्या स्थितीहून जास्तच वाईट होते.

1 योहान 5:16

जर एखाद्याला त्याचा भाऊ पापांत पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम अनंतकाळचे मरण नसेल तर त्या भावासाठीत्याने प्रार्थना करावी. आणि देव त्याला जीवन देईल. ज्या गोष्टीचा परिणाम अनंतकाळचे मरण नाही अशा पापामध्येपडणाऱ्यासाठी जे जीवन (देव देतो) त्या जीवनाविषयी मी हे बोलत आहे. ज्या पापाचा परिणाम मरण आहे. अशा तऱ्हेच्यापापाबाबत तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.

Interlinear

Choose Theme