Home Bibles एज्रा 2 · मराठी बायबल ||

एज्रा

Chapter 2

मराठी बायबल
1पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला. 2शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे: 3परोशाचे वंशज 2,172 4शफाट्याचे वंशज 372 5आरहाचे वंशज 775 6येशूवा व यवाब यांच्या घराण्यातीलपहथमवाबा चे वंशज 2,812 7एलामाचे वंशज 1,254 8जत्तूचे वंशज 9459 जक्काईचे वंशज 760 10बानीचे वंशज 642 11बेबाईचे वंशज 623 12अजगादाचे वंशज 1,222 13अदोनिकामचे वंशज 666 14बिग्वईचे वंशज 2,056 15आदीनाचे वंशज 454 16हिज्कीयाच्या घराण्यातीलआटेरचे वंशज 98 17बेसाईचे वंशज 323 18योराचे वंशज 112 19हाशूमाचे वंशज 223 20गिबाराचे वंशज 95 21बेथलहेमा नगरातील 123 22नटोफा नगरातील 56 23अनाथोथ मधील 128 24अजमावेथ मधील 42 25किर्याथ-आरीम, कफीरा आणिबैरोथ येथील 743 26रामा व गेबा मधील 621 27मिखमासमधील 122 28बेथेल आणि आय येथील 223 29नबो येथील 52 30मग्वीशचे लोक 156 31एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,254 32हारीम येथील 320 33लोद, हादीद आणि ओनो येथील 725 34यरीहो नगरातील 345 35सनाहाचे 3,630 36याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 973 37इम्मेराचे वंशज 1,052 38पशूहराचे वंशज 1,247 39हारीमाचे वंशज 1,017 40लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचेवंशज 74 41गायक असे:आसाफचे वंशज 128 42मंदिराच्या द्वारपालांचे वंशज:शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा,हतीत आणि शोबाई यांचे वंशज 139 43मंदिरातील पुढील विशेष सेवेकऱ्यांचे वंशज:सीहा, हसूफा, तब्बाबोथ, 44केरोस, सीहा, पादोन,. 45लबाना, हगबा, अकूबा, 46हागाब, शम्लाई, हानान, 47गिद्देल, गहर, राया, 48रसीन, नकोदा, गज्जाम, 49उज्जा, पासेह, बेसाई, 50अस्ना, मऊनीम, नफूसीम 51बकबुक हकूफ, हरहुर, 52बस्लूथ, महीद, हर्षा, 53बकर्स, सीसरा, तामह, 54नसीहा, हतीफा 55शलमोनाच्या सेवाकांचे वंशज:सोताई, हसोफरत, परुदा, 56जाला, दकर्न, गिद्देल, 57शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी 58मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचेंवंशज 392 59तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे: 60दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज 652 61याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज. 62आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत. 63त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती. 64एकंदर 42,360 लोक परत आले. त्यामध्ये त्यांच्या 7,337स्त्री - पुरुष चाकरांची गणती केलेली नाही. त्यांच्याबरोबर 200 स्त्रीपुरुष गायकही होते. 65 6636घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6,720 गाढवे होती. 67 68हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती. 69या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100. 70याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.

Choose Theme