Home Bibles एज्रा 2:1 · मराठी बायबल
एज्रा 2:1 · मराठी बायबल

पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.

Cross references

2 राजे 24:14

नबुखद्नेस्सरने यरुशलेममधली सगळी वडीलधारी मंडळी आणि धनवान लोक यांना कैद केले. दहाहजार लोकांना त्याने कैद केले. कुशल कामगार आणि कारागिर यांनाही त्याने पकडले. अगदी गरीबातला गरीब माणूस वगळता कोणालाही मोकळे ठेवले नाही.

2 राजे 25:11

नगरात अजून असलेले लोक नबुजरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले.

1 इतिहास 9:1

इस्राएलच्या सर्व लोकांची नोंद वंशावळ्यांमध्ये केलेली आहे. इस्राएलच्या राजाचा इतिहास या पुस्तकात ती ग्रंथित केलेली आहे.देवाशी एकनिष्ठ न राहिल्याने यहूदाच्या लोकांना बाबेल येथे कैद करुन नेण्यात आले.

1 इतिहास 9:2

त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, गावात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग.

2 इतिहास 36:1

यहूदाच्या लोकांनी यरुशलेमचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली. यहोआहाज हा योशीयाचा मुलगा.

2 इतिहास 36:20

अजूनही हयात असलेल्या लोकांना नबुखदनेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले.

एज्रा 2:70

याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.

एज्रा 5:8

हे राजा, आम्ही यहूदाप्रांतात गेल्याचे तुम्हाला माहीत आहे. आम्ही महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहुदातील लोक मोठे दगड वापरुन हे मंदिर नव्याने बांधित आहेत. भिंतीत लांबरुंद लाकडे घालत आहेत. यहुदी लोक हे काम मोठया झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल.

एज्रा 6:2

मेदी प्रांतातील अखमथा किल्ल्यात (राजवाड्यात) एक गुंडाळी सापडली. तिच्यावर पुढीलप्रमाणे मजकूर लिहिलेला होता:अधिकृत टिपण:

नहेम्या 7:6

बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने या लोकांना बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहुदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.

नहेम्या 12:1

यहुदाच्या प्रदेशात परत आलेले याजक व लेवी पुढीलप्रमाणे: शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते आले. त्यांच्या नावांची यादी अशी: सराया, यिर्मया, एज्रा,

एस्तेर 1:1

राजा अहश्वेरोशच्या कारकिर्दीतील गोष्ट. हिंदुस्तानपासून कूश पर्यंत एकशेसत्तावीस प्रांतांवर तो राज्य करत होता.

एस्तेर 1:3

आपल्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने आपले प्रधान आणि अधिकारी यांना मेजवानी दिली. पारस आणि मेदय या प्रांतांमधले सैन्याधिकारी आणि महत्वाचे कारभारीही त्या ठिकाणी होते.

एस्तेर 1:8

सर्व आमंत्रितांना मनसोक्त द्राक्षारस देण्यात यावा अशी राजाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली होती व सेवक राजाची आज्ञा पाळत होते.

एस्तेर 8:9

राजाच्या लेखकांना ताबडतोब बोलवण्यात आले. तिसऱ्या म्हणजे शिवान महिन्याच्या तेविसाव्या दिवशी हे झाले. सर्व यहुदी आणि हिंन्दूस्तानपासून कूशपर्यंतच्या एकशेसत्तावीस प्रांतांमधील अधिपती, अधिकारी आणि सरदार यांना उद्देशून मर्दखयने दिलेले सर्व आदेश त्या लेखकांनी लिहून काढले. प्रत्येक प्रांताच्या भाषेत ते लिहिण्यात आले. प्रत्येक भाषिक गटाच्या भाषेत त्यांचा अनुवाद करण्यात आला. यहुद्यांच्या भाषेत आणि त्यांच्या लिपीत ते आदेश लिहिले गेले.

यशया 48:20

माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा, ही वार्ता लोकांना आनंदाने सांगा. जगातील दूरदूरच्या ठिकाणी ही बातमी पोहोचवा. लोकांना सांगा, “परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याची सुटका केली.

यिर्मया 39:1

अशा रितीने यरुशलेमचा पाडाव झाला. यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला. नगरीचा पाडाव करण्यासाठी त्याने नगरीला वेढा घातला.

यिर्मया 50:19

“मी इस्राएलला त्याच्या भूमीत परत आणीन. कर्मेलच्या डोंगरावर व बाशानच्या भूमीत वाढलेले धान्य तो खाईल व तृप्त होईल. एफ्राईम व गिलाद येथील टेकड्यांवर तो चरेल.”

यिर्मया 52:1

सिद्कीया त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने 11 वर्षे यरुशलेमवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती यिर्मयाची मुलगी होती. तिचे घराणे लिब्ना येथील होते.

विलापगीत 1:3

यहूदाने फार सोसले. नंतर यहूदाला कैद करून परमुलुखांत नेले गेले. यहूदा इतर राष्ट्रंमध्ये जगते, पण तिला आराम मिळाला नाही. तिचा पाठलाग करणाऱ्यांनी तिला पकडले. अरूंद दरीत त्यांनी तिला गाठले.

विलापगीत 1:5

यरुशलेमच्या शत्रूंची जीत झाली आहे. त्यांना यश मिळाले आहे. परमेश्वराने तिला शिक्षा केली म्हणून असे झाले. त्याने यरुशलेमच्या पापांबद्दल तिला शिक्षा केली. तिची मुले दूर निघून गेली. त्यांचे शत्रू त्यांना पकडून घेऊन गेले.

विलापगीत 4:22

सियोन, तुझी शिक्षा संपली. आता पुन्हा तुला कैद करुन नेले जाणार नाही. पण अदोमवासीयांनो, तुमची पापे उघडी करुन परमेश्वर तुम्हाला शिक्षा करील.

सफन्या 2:7

त्यानंतर ती भूमी यहूदातील जिवंत राहिलेल्या लोकांच्या मालकीची होईल. यहूदातील ह्या लोकांची परमेश्वर आठवण ठेवील. आता ते परदेशांत कैदेत आहेत. पण परमेश्वर आठवण ठेवील. आता ते परदेशांत कैदेत आहेत. पण परमेश्वर त्यांना परत आणील. मग यहूदातील लोक, आपल्या मेंढ्यांना त्या कुरणांत चरु देतील. संध्याकाळी, ते अष्कलोनमधील रिकाम्या घरात आडवे होतील.

प्रेषितांचीं कृत्यें 23:34

राज्यपालाने ने पत्र वाचले, व पौल कोणत्या प्रांताचा आहे हे विचारले. जेव्हा त्याला समजले की, तो किलिकीयाचा आहे, तेव्हा तो म्हणाला,

Interlinear

Choose Theme