Home Bibles एज्रा 2:34 · मराठी बायबल
एज्रा 2:34 · मराठी बायबल

यरीहो नगरातील 345

Cross references

1 राजे 16:34

याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा मुलगा अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा मुलगा सगूब हा वारला. नूनचा मुलगा यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले.

2 इतिहास 28:15

तेव्हा अजऱ्या, बरेख्या, यहिज्कीया आणि अमासा यांनी पुढे होऊन कैद्यांना जवळ केले. त्यांतील उघड्या नागड्या लोकांना त्यांनी लुटीतले कपडेलत्ते दिले. जे अनवाणी होते त्यांना पादत्राणे दिली. त्या सर्वांना त्यांनी खाऊ पिऊ घातले. मर्दनासाठी तेल दिले. एवढे झाल्यावर या प्रमुखांनी चालायचे त्राण नसलेल्या कैद्यांना गाढवावर बसवले आणि या सर्वांना त्यांनी यरीहो या त्यांच्या गावी घरी नेऊन सोडले. यरीहोला खजुरीच्या झाडांचे नगर असेही म्हणतात. मग ही चार वडीलधारी मंडळी शोमरोनला परतली.

नहेम्या 3:2

याजकांच्या शेजारी यरीहोच्या लोकांनी भिंत बांधली आणि इम्रीचा मुलगा जक्कूर याने यरीहोच्या लोकांच्या कामालगत भिंतीचे बांधकाम केले.

नहेम्या 7:36

यरीहो या गावचे लोक345

Interlinear

Choose Theme