Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 16:10 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 16:10 · मराठी बायबल

पौलाला हा दृष्टान्त झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी यासाठी देवाने आम्हांला बोलाविले. हे आम्ही समजलो. आणि लगेच मासेदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो.

Cross references

स्तोत्रसंहिता 119:60

अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.

नीतिसूत्रे 3:27

जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट करा.

प्रेषितांचीं कृत्यें 10:29

याच कारणासाठी जेव्हा हे लोक मला बोलावण्यास आले, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घातला नाही. आता, कृपा करुन मला सांगा, तुम्ही मला येथे का बोलाविले?”

प्रेषितांचीं कृत्यें 14:7

त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी सुवार्ता सांगितली.

प्रेषितांचीं कृत्यें 16:10

पौलाला हा दृष्टान्त झाल्यावर आम्ही तेथे जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी यासाठी देवाने आम्हांला बोलाविले. हे आम्ही समजलो. आणि लगेच मासेदोनियाला जाण्याच्या तयारीला लागलो.

प्रेषितांचीं कृत्यें 20:5

ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस येथे आमची वाट पाहू लागली.

प्रेषितांचीं कृत्यें 20:13

तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वत: पायी जायचे.

प्रेषितांचीं कृत्यें 21:1

त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो. आणि सरळ प्रवास करीत कोस येथे आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही रुदास गेलो. तेथून आम्ही पातरा येथे गेलो.

प्रेषितांचीं कृत्यें 26:13

वाटेत भर दुपारच्या वेळी मी माइया व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता.

प्रेषितांचीं कृत्यें 27:1

जेव्हा आम्ही समुद्रमार्गे इटलीला जाण्याचे ठरविले तेव्हा पौल व इतर काही कैद्यांना युल्य नावाच्या शताधिपतीच्या हाती सोपविण्यात आले. युल्य हा सम्राटाच्या सेनेतील एक अधिकारी होता.

2 करिंथकरांस 2:12

जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर,

Interlinear

Choose Theme