Home Bibles 2 करिंथकरांस 2:12 · मराठी बायबल
2 करिंथकरांस 2:12 · मराठी बायबल

जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर,

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 14:27

जेव्हा ते तेथे पोहोंचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने कसे दार उघडले ते सांगितले,

प्रेषितांचीं कृत्यें 16:8

म्हणून ते मिसियाजवळून जाऊन त्रोवस येथे गेले.

प्रेषितांचीं कृत्यें 20:1

जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलाविले आणि त्यांना उत्तेजत दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. आणि तो मासेदोनियाला निघाला.

प्रेषितांचीं कृत्यें 20:8

वरच्यामजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते.

रोमकरांस 1:1

प्रेषित होण्यासाठी पाचारण केलेला; देवाची सुवार्ता सांगण्यासाठी वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा सेवक पौल याजकडून,

1 करिंथकरांस 16:9

कारण माइयासाठी मोठे आणि परिणामकारक दार उघडले आहे. आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात.

कलस्सैकरांस 4:3

त्याचवेळी आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा, यासाठी की, ख्रिस्ताविषयीचे जे रहस्य देवाने आम्हांला कळविले, त्याविषयी बोलण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी, देवाने आमच्यासाठी दार उघडावे. कारण त्या उपदेश करण्याने मी बंधनात आहे.

प्रकटीकरण 3:7

“फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही:“जो पवित्र, सत्य, जो दाविदाची किल्ली ठेवतो त्याचे हे शब्द आहेत, जे तो उघडतो, ते कोणी बंद करु शकणार नाहीआणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.

Interlinear

Choose Theme