योवाश याजकांना म्हणाला, “परमेश्वराच्या मंदिराची आर्थिक स्थिती चांगली आहे. लोकांनी मंदिराला बरेच काही दिले आहे. शिरगणती झाली तेव्हा लोकांनी कर भरला. केवळ इच्छेखातरही लोकांनी पैसे दिले. तुम्ही याजकांनी आता त्या पैशाचा विनियोग परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी करायला हवा. प्रत्येक याजकाने आपापल्या यजमानांकडून मिळालेले पैसे या कामी वापरले पाहिजेत. परमेश्वराच्या मंदिरात काही मोडतोड झाली असेत तर या पैशातून तिची दुरुस्ती व्हावी.”
Cross references
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“एकूण इस्राएल लोक किती आहेत याची तुला माहिती असावी म्हणून तू त्यांची शिरगणती करावीस; अशा प्रत्येक शिरगणतीच्या वेळी प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा; जो कोणी असा खंड देईल त्याच्यावर भयंकर संकट येणार नाही.
परमेश्वरासाठी पवित्र अर्पणेगोळा करा; काय द्यावे ह्याविषयी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनात परमेश्वराकडे आणावे; सोने, चांदी, पितळ;
ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.
ज्या इस्राएल लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी आपल्या खुषीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली; परमेश्वराने मोशेला व लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे वस्तू बनविण्यास त्यांचा उपयोग झाला.
इस्राएल लोकांची जी जी अर्पणे आणली होती त्यांचा देवाचे पवित्रस्थान बांधण्यासाठी त्यांनी उपयोग केला. रोज सकाळी इस्राएल लोकांनी अर्पणे आणणे चालूच ठेवले.
“परमेश्वराची कोणतीही पवित्र वस्तूचुकून दूषित करुन कोणी पापी ठरला तर त्याने दोषार्पण म्हणून तू ठरवशील तितक्या किमतीचा दोष नसलेला मेंढा आणावा;
“इस्राएल लोकांना सांग: एखाद्या माणसाने परमेश्वराला मानवाचा विशेष नवस केला तर त्या माणसाचे मोल याजकाने येणेप्रमाणे ठरवावे:
तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
म्हणून एखाद्याला आपला एकदशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एकपंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.
मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात.
शलमोनही आपले वडील दावीद यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे मन:पूर्वक पालन करुन परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. दावीदाने सांगितलेल्या गोष्टींखेरीज आणखीही एक गोष्ट तो करत असे. यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.
राजा शलमोनाने स्वत:साठी महालही बांधला. त्याला तेरा वर्षे लागली.
योवाशच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वराला बऱ्याच गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशनेही बरेच काही परमेश्वराला दिले होते. योवाशने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरुशलेमला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही.
त्याने उंचवट्यावरील पुजास्थळे नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी अजूनही लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
परंतु उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
उंचस्थानातील पुजास्थळे, टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्यागर्द वृक्षाखाली त्याने यज्ञ केले, धूप जाळला.
या सर्व ठिकाणी ते धूप जाळत. इस्राएली लोकांनी तेथे येण्याआधी परमेश्वराने ज्या राष्ट्रांना त्या भूमीतून घालवून दिले होते त्यांच्यासारखेच वर्तन इस्राएल लोकांनी केले. त्या नीच कृत्यांनी परमेश्वर क्रुध्द झाला.
“तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे.
राजा दावीदाने त्या वस्तू शुध्दीकरण करुन परमेश्वराला अर्पण केल्या. अदोम, मवाब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी लोकांकडून आलेल्या वस्तूही त्याने अशाच परमेश्वराला वाहिल्या.
हे देवाचे मंदिर बांधून व्हावे असे मला मनापासून वाटते म्हणून सोन्या चांदीची माझी ठेवही मी देत आहे. पवित्र मंदिरासाठी मी हे करत आहे.
हे देवा, लोकांची तू पारख करतोस आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामणिक मनाने हे सगळे तुला सानंद अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत; हे मी पाहतो आहे.
मग त्याने व त्याच्या वडलांनी परमेश्वरासाठी करवून घेतलेल्या सोन्याचांदीच्या पवित्र वस्तू पुन्हा मंदिरात आणल्या.
लेवीनी मग यहूदा यरुशलेममध्ये दवंडी पिटली. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांना सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता.
सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका, देवाच्या सेवेसाठी शुचिर्भूत व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांनी मानलेला देव आहे. ज्या वस्तूं इथल्या नाहीत त्या इथून काढून टाका. त्या वस्तू म्हणजे घाणा असून त्या हे पवित्र मंदिर भ्रष्ट करतात.
याजकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा दहावा हिस्सा, इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरातील कोठारात जमा केल्या. कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता. शिमी त्याच्या हाताखाली होता. शिमी कोनन्याचा भाऊ होता.
रमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले.
त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना उदारपणे अनेक भेटवस्तू दिल्या. चांदी, सोने, पशू अशा मौल्यवान ऐंवजाचा त्यात समावेश होता.
या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100.
सर्व बाबेलभर फिरुन तू लोकांकडून तसेच याजक व लेवी यांच्याकडून देणग्या गोळा कराव्यास. स्वखूशीने दिलेल्या त्या वस्तू यरुशलेममधील त्यांच्या देवाच्या मंदिरासाठी आहेत.
मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर चीजवस्तू यांचे नीट वजन करुन या गोष्टी मी या बारा याजकांना दिल्या. या वस्तू राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि बाबेलमधील इस्राएल लोक यांनी दिल्या होत्या.
कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.