मंदिरासाठी देण्यात आलेले सोने, चांदी आणि इतर चीजवस्तू यांचे नीट वजन करुन या गोष्टी मी या बारा याजकांना दिल्या. या वस्तू राजा अर्तहशश्त, त्याचे मंत्री, प्रमुख अधिकारी, आणि बाबेलमधील इस्राएल लोक यांनी दिल्या होत्या.
Cross references
प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या कटोऱ्याचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्र स्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीचे कटोरे मिळून त्यांचे एकूण वजन जवळ जवळ ‘दोन हजार चारशे’ शेकेल होते.
पारसच्या कोरेश राजाने आपला कोशाधिकारी मिथ्रदाथ याला हे काम सांगितले. त्याने त्या काढून शेशबस्सर या यहूदी प्रमुखाच्या स्वाधीन केल्या
एज्रा, मी आणि माझे सात मंत्री तुला पाठवत आहोत. तू यहूदा आणि यरुशलेमला जावेस. देवाचे नियमशास्त्र तुझ्याकडे आहेच. त्याचे पालन लोक कसे काय करत आहेत ते तू पाहावेस.
इस्राएलच्या देवाला मी आणि माझे मंत्री सोने-चांदी पाठवत आहोत. ते तू तुझ्याबरोबर न्यावेस. देव यरुशलेममध्ये आहे.
सर्व बाबेलभर फिरुन तू लोकांकडून तसेच याजक व लेवी यांच्याकडून देणग्या गोळा कराव्यास. स्वखूशीने दिलेल्या त्या वस्तू यरुशलेममधील त्यांच्या देवाच्या मंदिरासाठी आहेत.
चौच्या दिवशी मंदिरात गेलो आणि सोने - चांदी व इतर वस्तू वजन करुन उरीया याजकाचा मुलगा मरेमोथ यांच्याकडे दिल्या. तेव्हा फिनहासचा मुलगा एलाजार तसेच येशूवाचा मुलगा योजाबाद आणि बिन्नुईचा मुलगा नोअद्या हे लेवी, एवढे जण मरेमोथ बरोबर होते.
ही जी विपुलता आम्हांकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हांवर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत.
शेवटी, बंधूंनो, जे काही सत्य आहे, जे काही उदात्त आहे, जे काही योग्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही सुंदर आहे, जे काही प्रशंसनीय आहे, जर सदगुण आहे, आणि जर काही स्तुति आहे, या गोष्टींनी तुमची मने भरुन टाका.