“इस्राएल लोकांना सांग: एखाद्या माणसाने परमेश्वराला मानवाचा विशेष नवस केला तर त्या माणसाचे मोल याजकाने येणेप्रमाणे ठरवावे:
Cross references
मग याकोबाने शपथ वाहून नवस केला; तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील; आणि जेथे जेथे मी जाईन तेथे तो माझे रक्षण करील; आणि जर तो मला खावावयास अन्न व ल्यावयास वस्त्र पुरवील;
“इस्राएल लोकांस असे सांग की कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने आपणास इतरापासून वेगळे होऊन काही काळपर्यंत पूर्णपणे परमेश्वरास वाहून घ्यावयाचा नवस केला तर त्याने किंवा तिने सर्वकाळ परमेश्वराच्या सेवेसाठी वाहून घ्यावे. त्यांना नाजीर म्हणावे.
नंतर इस्राएल लोकांनी परमेश्वरला खास वचन दिले: “परमेश्वरा या लोकांचा पराभव करायला आम्हाला मदत कर. जर तू हे केले तर आम्ही तुला त्यांची शहरे देऊ. आम्ही त्यांचा संपूर्ण नाश करु.”
“एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात रहात असेल आणि तिने परमेश्वराला खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.
“तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल.
पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही.
जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. देव काही तुम्हाला ‘नवस बोला’ असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा.
“दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका.
इफ्ताह परमेश्वराला नवस बोलला तो म्हणाला, “तू जर मला अम्मोन्यांचा पराभव करु दिलास तर.
दोन माहिने असे गेल्यावर ती आपल्या बापाकडे परत आली. इफ्ताहने परमेश्वराला नवस बोलल्याप्रमाणे सर्व काही केले. इफ्ताहची मुलगी कुमारिकाच राहिली. तेव्हा इस्राएलामध्ये एक प्रथा पडून गेली.
परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”
आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.” हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवलेआणि परमेश्वराची भक्ती केली.
खूप काळजी केल्यामुळे वाईट स्वप्रे पडतात आणि मूर्खाकडून खूप शब्द बोलले जातात.
जर तुम्ही देवाला वचन दिले असेल तर ते पाळा. ती वचने पाळायला वेळ लावू नका. देव मूर्खांबद्दल आनंदी नसतो. जे देण्याचे वचन तुम्ही देवाला दिले होते ते त्याला द्या.