Home Bibles निर्गम 35:5 · मराठी बायबल
निर्गम 35:5 · मराठी बायबल

परमेश्वरासाठी पवित्र अर्पणेगोळा करा; काय द्यावे ह्याविषयी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनात परमेश्वराकडे आणावे; सोने, चांदी, पितळ;

Cross references

निर्गम 25:2

“इस्राएल लोकांना माझ्यासाठी अर्पणे आणावयास सांग. प्रत्येक माणसाने माझ्यासाठी काय अर्पण आणावयाचे ते मनापासून ठरवून आणावे; ही अर्पणे तू माझ्यासाठी स्वीकारावी.

निर्गम 35:29

ज्या इस्राएल लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी आपल्या खुषीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली; परमेश्वराने मोशेला व लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे वस्तू बनविण्यास त्यांचा उपयोग झाला.

शास्ते 5:9

ज्यांनी स्वेच्छेने युध्दावर जाण्याचे पत्करले त्या इस्राएल लोकांच्या सेनाधिपती बरोबर माझे हृदय आहे. परमेश्वराचा धन्यवाद करा.

स्तोत्रसंहिता 110:3

तू तुझ्या सैन्याची जमावाजमव करशील त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील. त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील. हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील.

मार्क 12:41

येशू दानपेटीच्या समोर बसला असता लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता. आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते.

2 करिंथकरांस 8:11

आता ते काम पूर्ण करा, यासाठी की कार्य करण्याची तुमची उत्सुकता ही ती तुमच्याकडे ज्या प्रमाणात आहे त्यानुसार पूर्ण करण्यात यावी.

2 करिंथकरांस 9:7

प्रत्येक माणसाने अंत:करणात ठरविल्याप्रमाणे द्यावे, खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये. कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो.

Interlinear

Choose Theme