Home Bibles 2 इतिहास 31:12 · मराठी बायबल
2 इतिहास 31:12 · मराठी बायबल

याजकांनी परमेश्वरासाठी अर्पण केलेल्या वस्तू धान्याचा अथवा पशूंचा दहावा हिस्सा, इतर काही वाहिलेल्या गोष्टी आत आणल्या आणि मंदिरातील कोठारात जमा केल्या. कोनन्या लेवी हा या भांडारावरचा प्रमुख अधिकारी होता. शिमी त्याच्या हाताखाली होता. शिमी कोनन्याचा भाऊ होता.

Cross references

2 राजे 12:15

कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशेब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते.

1 इतिहास 26:20

अहीया हा लेवी घराण्यातील होता. देवाच्या मंदिरातील मौल्यवात चीजवस्तूंच्या कोठारावर तो प्रमुख होता. पवित्र उपकरणे ठेवलेल्या जागेची जबाबदारी अहीयावर होती.

2 इतिहास 35:9

कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना 500 कोकरे मेंढरे व 500 बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले. कोनन्या इत्यादी मंडळी लेव्यांची प्रमुख होती.

नहेम्या 10:39

इस्राएल लोक आणि लेवी यांनी धान्य, नवीन द्राक्षरस आणि तेल यांची अर्पणे कोठारामध्ये आणावीत. मंदिरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तेथे असतात तसेच सेवा करणारे याजक, गायक आणि द्वारपाल यांचेही वास्तव्य तिथे असते.“देवाच्या मंदिराची आम्ही नीट जपवणूक करु असे आम्ही वचन देतो.”

Interlinear

Choose Theme