Home Bibles निर्गम 30:12 · मराठी बायबल
निर्गम 30:12 · मराठी बायबल

“एकूण इस्राएल लोक किती आहेत याची तुला माहिती असावी म्हणून तू त्यांची शिरगणती करावीस; अशा प्रत्येक शिरगणतीच्या वेळी प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा; जो कोणी असा खंड देईल त्याच्यावर भयंकर संकट येणार नाही.

Cross references

निर्गम 38:25

लोकांपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी पावणेचार टनाहूनअधिक होती.

गणना 1:2

“सर्व इस्राएल लोकांची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्यांच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.

गणना 26:2

तो म्हणाला, “इस्राएल लोकांची मोजणी करा, 20 वर्षाचे आणि 20 वर्षावरील सगव्व्या पुरुषांची मोजणी करा आणि त्यांची वंशाप्रमाणे यादी करा. तेच पुरुष इस्राएलच्या सैन्यात काम करू शकतील.”

गणना 31:49

त्यांनी मोशेला सांगितले, “आम्ही तुझ्या सेवकांनी आमचे सैनिक मोजले. आम्ही एकही सैनिक सोडला नाही.

गणना 31:50

म्हणून आम्ही प्रत्येक सैनिकाकडून परमेशवराची भेट आणत आहोत. आम्ही सोन्याच्या वस्तू आणत आहोत-बाजूबंद, बांगड्या, आंगठ्या, कुड्या आणि हार. आम्हाला शुद्ध करण्यासाठी या परमेशवराच्या भेटी आहेत.”

2 शमुवेल 24:1

इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”

2 शमुवेल 24:4

पण राजा दावीदाचे शब्द यवाबाच्या शब्दांपेक्षा प्रभावी ठरले आणि त्यांनी यवाबाला आणि इतर सैन्याधिकाऱ्यांना इस्राएल प्रजेची मोजदाद करण्यास सांगितले. तेव्हा ते सर्व या कामाला लागले.

1 इतिहास 21:1

सैतान इस्राएल लोकांच्या विरुध्द होता. त्याने दावीदाला इस्राएल लोकांची जनगणना करण्यास प्रवृत्त केले.

1 इतिहास 21:3

यावर यवाब म्हणाला, “परमेश्वर आपले राष्ट्र आहे त्यापेक्षा शंभर पटीने वाढवो. इस्राएलमधील सर्व लोक आपले दास आहेत, तेव्हा माझे स्वामीराज, आपण ही गोष्ट कशासाठी करता? त्याने इस्राएलचे लोक दोषी आणि पातकी ठरतील.”

1 इतिहास 21:14

तेव्हा परमेश्वराने इस्राएलभर रोगराई पसरवली. त्यात 70,000 लोक मृत्युमुखी पडले.

1 इतिहास 27:24

सरुवेचा मुलगा यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही गणती दावीद राजाच्या बखरीत नोंदलेली नाही.

2 इतिहास 24:6

तेव्हा राजा योवाशने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि विचारले की, “लेवींना तू यहूदा आणि यरुशलेममधून कर गोळा करायला का लावले नाहीस? परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी हा कर पवित्र सभामंडपासाठी म्हणून वापरलेला आहे.”

2 इतिहास 24:9

लेवीनी मग यहूदा यरुशलेममध्ये दवंडी पिटली. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांना सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता.

ईयोब 33:24

देवदूत त्याच्याशी देयेने वागेल. कदाचित् देवदूत देवाला सांगेल. ‘या माणसाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचव. त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’

ईयोब 36:18

ईयोब, तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. पैशामुळे तू आपला विचार बदलू नकोस.

स्तोत्रसंहिता 49:7

कुणीही मानवी मित्र तुम्हाला वाचवू शकणार नाही आणि तुम्ही देवाला लाच देऊ शकत नाही.

मत्तय 20:28

म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे जो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”

मार्क 10:45

कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे. व अनेकांसाठी आपले जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.”

1 तीमथ्याला 2:6

सर्व लोकांच्या पापांची खंडणी म्हणून त्याने स्वत:ला दिले. अशा प्रकारे देवाच्या योजनेविषयी त्याने योग्य वेळी साक्षा दिली.

1 पेत्र 1:18

तुम्हांला माहीत आहे की, सोने किंवा चांदी अशा कोणत्याही नाश पावणाऱ्या वस्तूंनी निरर्थक जीवनापासून तुमची सुटका करण्यात आली नाही. जी तुम्हांला तुमच्या पूर्वजापासून मिळाली आहे.

Interlinear

Choose Theme