स्तोत्रसंहिता
Chapter 137
मराठी बायबल1आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो आणि सियोनची आठवण काढून रडलो.
2आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या.
3बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले. त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले. त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
4परंतु परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही.
5यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.
6यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.
7यरुशलेम नेहमी माझा सर्वांत मोठा आनंद असेल असे मी वचन देतो.
8ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.
9जो माणूस तुझी मुले धरतो आणि त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.
Bible Study with Steffi App
Download Free ↗
Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.