स्तोत्रसंहिता
Chapter 123
मराठी बायबल1देवा, मी वर बघून तुझी पार्थना करतो. तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.
2गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी मालकावर अवलंबून असतात.
3त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
4परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा. खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो.5गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला. ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.
Bible Study with Steffi App
Download Free ↗
Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.