Home Bibles स्तोत्रसंहिता 40:14 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 40:14 · मराठी बायबल

ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर आणि त्यांची निराशा कर. ते लोक मला दु:ख देणार आहेत. त्यांना शरमेने पळून जायला लाव.

Cross references

स्तोत्रसंहिता 9:3

माझे शत्रू तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पळाले. परंतु ते पडले आणि त्यांचा नाश झाला.

स्तोत्रसंहिता 22:12

माझ्याभोवती लोक आहेत ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.

स्तोत्रसंहिता 22:20

परमेश्वरा माझे आयुष्य तलवारी पासून वाचव माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांपासून वाचव.

स्तोत्रसंहिता 31:17

परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली कारण मला निराश व्हायचे नव्हते. वाईट लोक निराश होतील. ते मुकाटपणे थडग्यात जातील.

स्तोत्रसंहिता 35:4

काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर. त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत. त्यांना गोंधळात अडचणीत टाक.

स्तोत्रसंहिता 35:26

माझ्या सगळ्या शत्रूंना शरम वाटावी, ते गोंधळून जावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ते लोक आनंदी होते ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते. म्हणून ते लोक अपमानाने आणि लाजेने झाकोळून जावोत.

स्तोत्रसंहिता 70:1

देवा, माझा उध्दार कर. देवा लवकर ये आणि मला मदत कर.

स्तोत्रसंहिता 70:2

लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा कर त्यांची मानखंडना कर. लोकांना माझ्या बाबतीत वाईटगोष्टी करायच्या आहेत ते पडावेत आणि त्यांना लाज वाटावी असी माझी इच्छा आहे.

स्तोत्रसंहिता 71:13

माझ्या शत्रूंचा पराभव कर. ते मला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना त्याबद्दल लाज वाटावी अशी माझी इच्छा आहे.

स्तोत्रसंहिता 109:20

परमेश्वर या सगळ्या गोष्टी माझ्या शत्रूंच्याबाबतीत करील अशी मी आशा करतो. जे लोक मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत त्या सर्वांना परमेश्वर या गोष्टी करेल अशी मी आशा करतो.

यशया 41:11

बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत. पण ते लज्जित होतील. तुझे शत्रू नाहीसे होतील व कायमचे निघून जातील.

यशया 45:24

लोक म्हणतील ‘चांगलुपणा आणि सामर्थ्य फक्त परमेश्वराकडूनच मिळते.”‘काही लोक देवावर रागावतात पण परमेश्वराचे साक्षीदार येतील आणि परमेश्वराने केलेल्या गोष्टींबद्दल सांगतील, मग परमेश्वरावर रागावणारे लोक लाजेने माना खाली घालतील.

मत्तय 21:38

पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले. हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.

योहान 18:6

जेव्हा येशू म्हणाला, “तो मी आहे,” ते मागे सरले आणि जमिनीवर पडले.

प्रेषितांचीं कृत्यें 9:4

शौल जमिनीवर पडला, एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला! तू माझा छळ का करतोस?”

प्रेषितांचीं कृत्यें 12:23

आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून देवाच्या दूताने लगेच त्याला आजारी पाडले. किड्यांनी त्याला आतून खाल्ले आणि तो मेला.

Interlinear

Choose Theme