Cross references
2 शमुवेल 17:1
शिवाय अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, “मला आता बाराहजार माणसांची निवड करु दे म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो.
स्तोत्रसंहिता 38:1
परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 40:13
परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव. परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर.
स्तोत्रसंहिता 40:14
ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर आणि त्यांची निराशा कर. ते लोक मला दु:ख देणार आहेत. त्यांना शरमेने पळून जायला लाव.
स्तोत्रसंहिता 69:18
ये माझ्या आत्म्याचा उध्दार कर. मला माझ्या शत्रूंपासून सोडव.
स्तोत्रसंहिता 71:12
देवा, मला सोडून जाऊ नकोस. देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव.
स्तोत्रसंहिता 143:7
परमेश्वरा, त्वरा करुन मला उत्तर दे. माझा धीर आता सुटला आहे. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला मरु देऊ नकोस आणि थडग्यात पडलेल्या मेलेल्या माणसांप्रमाणे मला होऊ देऊ नकोस.