Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 9:4 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 9:4 · मराठी बायबल

शौल जमिनीवर पडला, एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला! तू माझा छळ का करतोस?”

Cross references

उत्पत्ति 3:9

तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?”

उत्पत्ति 16:8

देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?”हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”

उत्पत्ति 22:11

परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला,“अब्राहामा! अब्राहामा!”अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”

निर्गम 3:4

मोशे झुडूपाजवळ येत होता हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडूपातून देवाने मोशेला हाक मारून म्हटले, “मोशे मोशे!”आणि मोशे म्हणाला, “मी इथे आहे.”

गणना 16:45

“त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले.”

यशया 63:9

लोकांपुढे अनेक संकटे होती. पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द नव्हता. परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती. म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले, त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.

जखऱ्या 2:8

का? कारण जर त्यांनी तुला दुखविले तर ते (कृत्य) देवाच्या डोळ्यातील बुबुळाला इजा करण्यासारखेच आहे.

मत्तय 25:40

“मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला खरे सांगतो: येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.

मत्तय 25:45

“मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला खरे सांगतो: माझ्या अनुयायतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.

लूक 10:41

प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस.

योहान 18:6

जेव्हा येशू म्हणाला, “तो मी आहे,” ते मागे सरले आणि जमिनीवर पडले.

योहान 20:16

येशू तिला म्हणाला, “मरीये” ती त्याच्याडे वळाली आणि अरेमी भाषेत मोठ्याने ओरडली, “रब्बनी!” (याचा अर्थ गुरुजी)

योहान 21:15

मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला, “योहानाच्या मुला, शिमोना, तू माझ्यावर या सर्वापेक्षा अधिक प्रीति करतोस काय?”तो म्हणाला, “होय प्रभु, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”येशू म्हणाला, “माझ्या कोकरांना चार.”

प्रेषितांचीं कृत्यें 5:10

त्याच क्षणी सप्पीर त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली, त्यांनी पाहिले की, ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले.

प्रेषितांचीं कृत्यें 22:7

मी जमिनीवर पडलो. आणि मी एक वाणी माइयाशी बोलताना ऐकली, ʅशौला, शौला, माझा छळ तू का करतोस?

प्रेषितांचीं कृत्यें 26:14

आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि हिब्रू भाषेत माइयाशी बोलताना एक वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, ‘शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? अणुकुचीदार काठीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे,’

रोमकरांस 11:22

अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल.

1 करिंथकरांस 4:7

कोण म्हणतो की तू दुसऱ्यापेक्षा चांगला आहेस? आणि तुझ्याजवळ असे काय आहे जे तुला मिळाले नाही? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?

1 करिंथकरांस 12:12

कारण ज्याप्रमाणे आपणातील प्रत्येकाला एकच शरीर आणि त्याला अनेक अवयव असतात, आणि तरीही सर्व अवयव जरी ते पुष्कळ असले तरी त्यांचे मिळून एक शरीर बनते. तसाच ख्रिस्तसुद्धा आहे.

इफिसकरांस 5:30

कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत.

Interlinear

Choose Theme