माझ्या शत्रूंचा पराभव कर. ते मला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना त्याबद्दल लाज वाटावी अशी माझी इच्छा आहे.
Cross references
आपल्याला नेस्तनाबूत करु पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहुदी एकत्र आले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द जायची कोणामध्येच ताकद नव्हती. यहुद्यांना ते लोक घारबले.
माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील. एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील.
काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर. त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत. त्यांना गोंधळात अडचणीत टाक.
माझ्या सगळ्या शत्रूंना शरम वाटावी, ते गोंधळून जावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्या तेव्हा ते लोक आनंदी होते ते माझ्यापेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटत होते. म्हणून ते लोक अपमानाने आणि लाजेने झाकोळून जावोत.
ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर आणि त्यांची निराशा कर. ते लोक मला दु:ख देणार आहेत. त्यांना शरमेने पळून जायला लाव.
लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते.
माझी जीभ नेहमी तुझ्या चांगुलपणाची गाणी गाईल आणि ज्या लोकांना मला ठार मारायची इच्छा होती त्यांचा पराभव होईल आणि ते कलंकित होतील.
माझ्या शत्रूंना लाज आण. त्यांना त्यांची लाजच अंगरख्या प्रमाणे घालायला लाव.
मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”
बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत. पण ते लज्जित होतील. तुझे शत्रू नाहीसे होतील व कायमचे निघून जातील.
पण परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. परमेश्वर बलवान सैनिकाप्रमाणे आहे. म्हणून माझा पाठलाग करणारे पडतील. ते माझा पराभव करु शकणार नाहीत. ते पडतील, त्यांची निराश होईल. त्यांची नामुष्की होईल आणि ही त्यांची नामुष्की इतर लोक कधीही विसरणार नाहीत.
त्याचप्रकारे तरुण बंधुनो, वडीलजनांच्या अधिन असा. आणि तुम्ही सर्वजण लिनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा कारण“देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो, पण दीनावर कृपा करतो.” नीतिसूत्रे 3:34