ती शहाणपणाचे बोल बोलते. ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते.
Cross references
तेव्हा ताबडतोब रिबकेने आपल्या खांद्यावरील घागर उतरुन त्याला पाणी पाजले; ती म्हणाली, “प्या बाबा;”
पण ती नवऱ्याला म्हणाली, “आपण मरावे असे परमेश्वराच्या मनात नाही. तसे असते तर त्याने आपले होमार्पण, धान्यार्पण स्वीकारले नसते. आपल्याला जे दिसले ते दाखवले नसते किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्या नसत्या”
त्याच्या पायाशी लोळण घेत ती त्याला म्हणाली, “कृपया मला बोलू द्या. मी काय म्हणते ते ऐकून घ्या. जे झाले त्याबद्दल दोष माझा आहे.
नगरात एक चाणाक्ष बाई राहात होती. तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, “माझे ऐका. यवाबाला येथे यायला सांगा. मला त्याच्याशी काही बोलायचे आहे.”
तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: तुम्हाला माझ्याकडे ज्याने पाठवले त्याला सांगा
एस्तेरच्या दासी आणि खोजे तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला मर्दखयविषयी सांगितले. तेव्हा राणी एस्तेर अतिशय दु:खी आणि नाराज झाली. शोकाच्या वस्त्रांऐवजी घालायला तिने मर्दखयकडे चांगली वस्त्रे पाठवली. पण तो ती घेईना.
राजाची माझ्यावर कृपादृष्टी असेल आणि मी मागेन ते द्यायला राजा खुशीने तयार असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानसाठी आणखी एक मेजवानी देईन. मला खरोखर काय हवे ते मी उद्या सांगीन.”
तेव्हा राणी म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझी मर्जी असेल तर कृपा करून मला जगू दे. माझ्या लोकांनाही जगू दे. एवढेच माझे मागणे आहे.
एस्तेर मग राजाशी पुन्हा बोलली. त्याच्या पायाशी स्वत:ला झोकून देऊन ती रडू लागली. आगागी हामानने आखलेली दुष्ट योजना राजाने रद्द करावी म्हणून त्याची विनवणी करु लागली. यहुद्यांना अपाय करण्याचा बेत हामानने आखला होता.
चांगले लोक शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. पण जो संकटे आणणाऱ्या गोष्टी सांगतो त्याचे ऐकणे लोक बंद करतात.
जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर ते शब्द तलवारीसारखे लागतात. पण शहाणा माणूस काळजी पूर्वक बोलतो. त्याचे शब्द दु:खावर फुंकर मारतात.
मायेच शब्द मद्यासारखे असतात. त्यांचा स्वीकार करणे सोपे असते आणि ते प्रकृतीसाठी चांगले असतात.
लोकांना त्यांच्या आई-वडिलांकडून घरे आणि पैसा मिळतो. पण चांगली बायको परमेश्वराकडून मिळालेला नजराणा आहे.
धीराचे बोलणे माणसाच्याच काय पण राजाच्या विचारातही बदल करु शकते. हळूवार बोलणे फार परिणामकारक असते.
जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे.
माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या गुहेत लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुला बघू दे. तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तू खूप सुंदर आहेस.
माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना अत्तरासारखा गोड सुवास आहे.
लेवीने मला मान दिला. त्याने खोटे शिकविले नाही लेवी प्रामाणिक होता आणि त्याला शांदीची आवड होती. तो मला मनुसरला आणि त्याने पुष्कळांना त्यांच्या पापाचरणापासून परावृत्त केले.
मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, आपण म्हणालात तसे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिला सोडून गेला.
ती मोठ्या आवाजात बोलली, “सर्व स्त्रियांमध्ये तू अधिक धन्य आहेस, तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.
धर्मसभेत बसलेल्या सर्व सभासदांनी स्तेफनाकडे न्याहाळून पाहिले. तेव्हा त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा दिसत होता.
नंतर तो यहूदी लोकांच्या सभास्थानात धैर्याने बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला यांनी त्याला बोलताना ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला एका बाजूला घेतले. आणि देवाच्या मार्गाविषयी अधिक अचूक रीतीने त्याला स्पष्ट करुन सांगितले.
तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो. यासाठी की, जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल.
बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा आणि प्रत्येक संधीचा चांगला फायदा करुन घ्या.
त्याचप्रमाणे, पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन असा. यासाठी की, त्यांच्यापैकी काहींनी जर देवाची आज्ञा पाळली नाही तर काही न बोलताही आपल्या सदवर्तनाने त्यांची मने जिंकता येतील.
त्याऐवजी तुमची सुंदरता अंत:करणाची, जी कधीही नाश पावत नाही, अशी असली पाहिजे ती सौम्य, शांत स्वभावाची असली पाहिजे जी देवाच्या दृष्टीने अतिमौल्यवान आहे.
शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा.