Home Bibles नीतिसूत्रे 31:8 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 31:8 · मराठी बायबल

जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे.

Cross references

1 शमुवेल 19:4

योनाथान आपल्या वडीलांशी बोलला. दावीदबद्दल त्याने चांगले उद्गार आणले. तो म्हणाला, “तुम्ही राजे आहात. दावीद तुमचा सेवक. त्याने तुमचे काहीच वाकडे केलेले नाही. तेव्हा तुम्हीही त्याला इजा पोचू देऊ नका. तो तुमच्याशी चांगलाच वागत आलेला आहे.

1 शमुवेल 19:6

शौलने योनाथानचे म्हणणे ऐकले आणि त्याला वचन दिले. तो म्हणाला, “परमेश्वर असेपर्यंत दावीदाच्या जिवाला धोका नाही.”

1 शमुवेल 20:32

योनाथान आपल्या वडीलांना म्हणाला, “त्याने काय केले? का म्हणून त्याने मेले पाहिजे?”

1 शमुवेल 22:14

अहीमलेख म्हणाला, “दावीद अतिशय भरवशाचा आहे. तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये त्याच्याइतका विश्वासू कोणी नाही. तो तुमचा जावईही आहे. तुमच्या अंगरक्षकांचा तो प्रमुख आहे. तुमचे कुटुंबीय त्याला मान देतात.

ईयोब 29:9

लोकप्रमुख बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.

ईयोब 29:12

का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्याला मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी नसले तर मी मदत करीत असे.

स्तोत्रसंहिता 79:11

कैद्यांच्या कण्हण्याकडे लक्ष दे देवा, मारण्यासाठी ज्यांची निवड झाली होती त्यालोकांना तुझ्या सामर्थ्याने वाचव.

स्तोत्रसंहिता 82:3

“गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.

नीतिसूत्रे 24:7

मूर्ख लोकांना शहाणपण कळू शकत नाही. आणि लोक जेव्हा महत्वाच्या गोष्टींची चर्चा करतात तेव्हा मूर्ख माणूस काहीही बोलू शकत नाही.

नीतिसूत्रे 24:11

जर लोक एखाद्याला ठार मारण्याचे ठरवीत असतील तर तुम्ही त्याला वाचवायला हवे.

यिर्मया 21:12

दावीदाच्या घराण्यातील लोकानो, परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही दररोज न्याय्यपणे लोकांचा निवाडा केला पाहिजे. गुन्हेगारांपासून बळींचे रक्षण करा. तुम्ही असे केले नाही, तर मी खूप रागावेन. माझा राग, कोणीही विझवू न शकणाऱ्या अग्नीप्रमाणे असेल. तुम्ही दुष्कृत्ये केली म्हणून असे होईल.’

यिर्मया 26:16

मग राज्यकर्ते व सर्व लोक बोलले, त्या लोकांनी याजकांना व संदेष्ट्यांना सांगितले, “यिर्मयाला अजिबात मारु नका. त्याने आपल्याला सांगितलेल्या गोष्टी परमेश्वराकडून आपल्या देवाकडून येतात.”

यिर्मया 26:24

पण अहीकाम या प्रतिष्ठित व्यक्तीने यिर्मयाला पाठिंबा दिला अहीकाम शाफानचा मुलगा होता. त्याने यिर्मयाला याजक व संदेष्टे यांच्यापासून वाचविले.

यिर्मया 38:7

यिर्मयाला त्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीत टाकले हे एबद-मलेख याने ऐकले. एबद-मलेख कुश देशाचा होता. तो राजाच्या पदरी एक प्रतिहारीम्हणून होता. सिद्कीया राजा बन्यामीनच्या प्रवेशद्वाराशी बसला होता. म्हणून एबद-मलेख राजवाड्यातून निघाला आणि राजाशी बोलण्यासाठी त्या प्रवेशद्वाराजवळ गेला.

योहान 7:51

“एखघा माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियसशास्त्राप्रमाणे दोषी ठरवता येत नाही.” त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करु शकत नाही.”

Interlinear

Choose Theme