Home Bibles शास्ते 13:23 · मराठी बायबल
शास्ते 13:23 · मराठी बायबल

पण ती नवऱ्याला म्हणाली, “आपण मरावे असे परमेश्वराच्या मनात नाही. तसे असते तर त्याने आपले होमार्पण, धान्यार्पण स्वीकारले नसते. आपल्याला जे दिसले ते दाखवले नसते किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्या नसत्या”

Cross references

उत्पत्ति 4:4

हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले.परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले.

स्तोत्रसंहिता 20:4

तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो. तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.

स्तोत्रसंहिता 25:14

परमेश्वर त्याचे रहस्य त्याच्या भक्तांना सांगतो. तो त्याच्या भक्तांना त्याचे करार शिकवतो.

स्तोत्रसंहिता 27:13

मला खरोखरच असा विश्वास वाटतो की मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल.

स्तोत्रसंहिता 86:17

देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव. माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील. तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.

नीतिसूत्रे 3:32

का? कारण परमेश्वर वाईट लोकांचा तिरस्कार करतो. परंतु परमेश्वर चांगल्या लोकांचा पाठीराखा असतो.

उपदेशक 4:9

एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.

योहान 14:20

त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे.

योहान 14:23

येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्चावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू.

योहान 15:15

आता मी तुम्हांला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हांला मित्र म्हणतो कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हांला कळविल्या आहेत.

1 करिंथकरांस 12:21

डोळा हाताला म्हणू शकत नाही की, “मला तुझी गरज नाही.” किंवा दुसरे उदाहरण द्यायचे तर डोक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.”

Interlinear

Choose Theme