तेव्हा राणी म्हणाली, “राजा, तुला मी आवडत असेन आणि तुझी मर्जी असेल तर कृपा करून मला जगू दे. माझ्या लोकांनाही जगू दे. एवढेच माझे मागणे आहे.
Cross references
त्याचे सेवक त्याला म्हणाले, ‘इस्राएलचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण जाडे कपडे घालून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळूनइस्राएलच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल सुध्दा.”
अहज्याने तिसऱ्या सरदारला पन्नास जणांसह पाठवले. तो ही सरदार आपल्या बरोबरच्या लोकांसह एलीयाकडे आला. हा सरदार गुडघे टेकून बसला आणि एलीयाची त्याने विनवणी केली. तो म्हणाला, “हे देवाच्या माणसा, मी आणि माझ्याबरोबरचे हे पन्नासजण यांच्या प्राणांचे मोल तू जाणावेस.
यहूद्यांच्या वधाच्या राजाज्ञेची प्रतही मर्दखयने हथाकला दिली. हा हुकूम शूशन नगरात सर्वत्र दिला गेला होता. हथाकने एस्तेरला तो हुकूम दाखवून सर्व काही तिला सांगावे अशी त्याची इच्छा होती. एस्तेरने राजाकडे जाऊन मर्दखय आणि तिचे लोक यांच्यासाठी दयेची याचना व मदत करण्यास हथाकने तिला प्रवृत करावे असेही त्याने सांगितले.
राजाची माझ्यावर कृपादृष्टी असेल आणि मी मागेन ते द्यायला राजा खुशीने तयार असेल तर राजा आणि हामान यांनी उद्याही यावे. उद्या मी राजासाठी आणि हामानसाठी आणखी एक मेजवानी देईन. मला खरोखर काय हवे ते मी उद्या सांगीन.”
राजाला अतिशय संताप आला. द्राक्षारस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला. पण हामान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेरजवळच थांबला. राजाने आपला वध करायचे ठरवले आहे याची कल्पना असल्यामुळे तो आपल्या प्राणांची भीक मागू लागला.
सैतानाने उत्तर दिले, “कातडीला कातडीमनुष्य जिवंत राहाण्यासाठी सर्व काही देऊ शकतो.
ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
जर ते असे म्हणाले तर तू त्यांना सांग ‘मी राजाकडे मला योनाथानच्या घरातील अंधार कोठडीत परत पाठवू नका.’ अशी गयावया केली. मी तेथे परत गेलो, तर मी मरेन.”