Home Bibles लूक 1:42 · मराठी बायबल
लूक 1:42 · मराठी बायबल

ती मोठ्या आवाजात बोलली, “सर्व स्त्रियांमध्ये तू अधिक धन्य आहेस, तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.

Cross references

उत्पत्ति 22:18

पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र तुझ्या वंशजाद्वारे आशीर्वाद पावेल; तू माझ्या सर्व आज्ञा पाळल्यास म्हणून मी हे करीन.”

शास्ते 5:24

याएल ही केनी हेबेरची पत्नी सर्व स्त्रियांमध्ये तिचा धन्यवाद होईल.

स्तोत्रसंहिता 21:6

देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास. राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.

स्तोत्रसंहिता 45:2

तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस. तू चांगला वक्ता आहेस म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देईल.

स्तोत्रसंहिता 72:17

राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या. जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या. त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या.

लूक 1:28

गब्रीएल तिच्याकडे आला आणि म्हणाला, “अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभु तुझ्याबरोबर आहे.”

लूक 1:48

कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली, होय, येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.

लूक 19:38

ते म्हणाले, “‘प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!’ स्वर्गात शांति आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव!”

प्रेषितांचीं कृत्यें 2:26

म्हणून माझे हृदय आनंदाने आहे आणि माझे तोंड आनंदाने बोलते. होय, माझे शरीरदेखील आशा धरुन राहील

रोमकरांस 9:5

त्यांचे पूर्वज थोर आहेत. मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदासर्वकाळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे. आमेन.

इब्री लोकांस 12:2

जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.

Interlinear

Choose Theme