Home Bibles मार्क 6:20 · मराठी बायबल
मार्क 6:20 · मराठी बायबल

कारण हेरोद योहानाला भीत असे. हेरोदाला माहीत होते की, योहान नितिमान आणि पवित्र मनुष्य आहे, म्हणून तो त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई परंतु तो आनंदाने त्याचे ऐकत असे.

Cross references

निर्गम 11:3

मिसरच्या लोकांनी तुम्हाशी दयाळूपणे वागावे व तुम्हाला त्या वस्तू द्याव्यात अशी परमेश्वर त्यांची मने वळवील. मिसरचे सर्व लोक आणि फारोचे सेवक देखील मोशे महान माणूस असल्याचे अगोदर पासून मानीत होते.”‘

1 राजे 21:20

तेव्हा एलीया अहाबकडे गेला. अहाबने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, “तुला मी पुन्हा सापडलो. तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस.”एलीया म्हणाला, “हो, तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस.

2 राजे 3:12

यहोशाफाट म्हणाला, “अलीशाच्या मुखातून परमेश्वरच बोलतो.”मग इस्राएलचा राजा यहोराम, यहोशाफाट आणि अदोमचा राजा असे तिघे जण अलीशाकडे गेले.

2 राजे 6:21

इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?”

2 राजे 13:14

अलीशा आजारी पडला. त्या आजारातच पुढे तो मरण पावला. इस्राएलचा राजा योवाश त्याला भेटायला गेला. अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्याला रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, ही इस्राएलच्या रथांची आणि घोड्यांची वेळ आहे का?”

2 इतिहास 24:2

यहोयादा हयात असेपर्यंत योवाशची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती.

2 इतिहास 24:15

पुढे यहोयादा वयोवृध्द झाला. तो दीर्घायुषी होऊन वारला. मृत्युसमयी त्याचे वय 130 वर्षे इतके होते.

2 इतिहास 26:5

जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले. तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.

स्तोत्रसंहिता 106:12

नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला. त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.

यहेज्केल 2:5

पण ते तुझे ऐकणार नाहीत. ते माझ्याविरुद्ध वागून पाप करीतच राहतील. का? कारण ते बंडखोर आहेत. ते नेहमीच माझ्याविरुध्द वागतात. पण तू ह्या गोष्टी त्यांना सांगच म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्यात एक संदेष्टा आहे.

यहेज्केल 33:32

“तू त्यांच्या दृष्टीने प्रेमगीते गाणारा फक्त एक गायक आहेस. तुझा गळा गोड आहे. तू तुझे वाद्य उत्तम वाजवितोस. ते तुझे फक्त ऐकतात पण त्याप्रमाणे ते करणार नाहीत.

दानीएल 4:18

माझे, नबुखद्नेस्सर राजाचे स्वप्न असे होते. आता, बेल्टशस्सर (दानीएल) मला त्याचा अर्थ सांग. माझ्या राज्यातला कोणीही ज्ञानी माणूस मला ह्याचा अर्थ सांगू शकणार नाही. पण बेल्टशस्सर तुझ्या अंगात देवाच आत्मा (वास करीत) असल्याने, तू ह्या स्वप्नाचा अर्थ लावू शकतोस.

दानीएल 4:27

तेव्हा राजा, माझे ऐक पाप करण्याचे सोडून दे. योग्य त्याच गोष्टी कर. वाईट कृत्ये करू नकोस गरिबांवर दया कर. मग कदाचित तुला यशच मिळेल.

दानीएल 5:17

मग दानीएल राजाला म्हणाला “बेलशस्सर राजा तुझी दाने तुलाच लखलाभ हावेत! त्या भेटी पाहिजे तर दुसऱ्या कणला दे.मला काही नको.मात्र भी तूला भिंतीवरचा लेख वाचून अर्थ सांगतो.

मत्तय 14:5

हेरोद त्याला मारावयास पाहत होता, पण तो लोकांना भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.

मत्तय 21:26

पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”

मार्क 4:16

काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात.

मार्क 11:18

मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्याला भीत होते.

योहान 5:35

पेटलेला दिवा प्रकाश देतो, तसाच योहान होता आणि तुम्हांला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला.”

Interlinear

Choose Theme