Home Bibles 2 इतिहास 24:2 · मराठी बायबल
2 इतिहास 24:2 · मराठी बायबल

यहोयादा हयात असेपर्यंत योवाशची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती.

Cross references

2 राजे 12:2

योवाशचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता.

2 इतिहास 24:17

यहोयादा मरण पावल्यावर यहूदाच्या सरदारांनी राजा योवाशला येऊन मुजरा केला. राजाने त्याचे ऐकून घेतले.

2 इतिहास 25:2

त्याची वर्तणूक परमेश्वराला पटेल अशी होती पण त्यात मन:पूर्वकता नव्हती.

2 इतिहास 26:4

उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले वडील अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले.

2 इतिहास 26:5

जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले. तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.

स्तोत्रसंहिता 78:36

आपण देवावर प्रेम करतो असे ते म्हणाले परंतु ते खोटे बोलले, ते मनापासून बोलत नव्हते.

स्तोत्रसंहिता 106:12

नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला. त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.

यशया 29:13

माझा प्रभू म्हणतो, “हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व माणसांनी घालून दिलेले नियम आहेत.

मार्क 4:16

काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात.

Interlinear

Choose Theme