Home Bibles यहेज्केल 33:32 · मराठी बायबल
यहेज्केल 33:32 · मराठी बायबल

“तू त्यांच्या दृष्टीने प्रेमगीते गाणारा फक्त एक गायक आहेस. तुझा गळा गोड आहे. तू तुझे वाद्य उत्तम वाजवितोस. ते तुझे फक्त ऐकतात पण त्याप्रमाणे ते करणार नाहीत.

Cross references

यशया 42:20

माझ्या सेवकाने काय करायला हवे ते त्याला दिसते पण ते माझी आज्ञा पाळत नाही. तो कानाने ऐकू शकतो पण माझे म्हणणे ऐकण्यायचे तो नाकारतो.”

यिर्मया 42:21

म्हणून आज मी तुम्हाला परमेश्वराचा संदेश सांगितला आहे. पण तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली नाही. परमेश्वराने ज्या गोष्टी तुम्ही कराव्या हे सांगण्यासाठी मला तुमच्याकडे पाठवले होते, त्या गोष्टी तुम्ही केल्या नाहीत.

मार्क 4:16

काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बियांसारखे असतात. ते ऐकतात तेव्हा लगेच आनंदाने ग्रहण करतात.

मार्क 6:20

कारण हेरोद योहानाला भीत असे. हेरोदाला माहीत होते की, योहान नितिमान आणि पवित्र मनुष्य आहे, म्हणून तो त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई परंतु तो आनंदाने त्याचे ऐकत असे.

योहान 5:35

पेटलेला दिवा प्रकाश देतो, तसाच योहान होता आणि तुम्हांला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला.”

Interlinear

Choose Theme