Home Bibles दानीएल 5:17 · मराठी बायबल
दानीएल 5:17 · मराठी बायबल

मग दानीएल राजाला म्हणाला “बेलशस्सर राजा तुझी दाने तुलाच लखलाभ हावेत! त्या भेटी पाहिजे तर दुसऱ्या कणला दे.मला काही नको.मात्र भी तूला भिंतीवरचा लेख वाचून अर्थ सांगतो.

Cross references

उत्पत्ति 14:23

मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही.

2 राजे 3:13

अलीशा यहोरामला म्हणाला, “माझ्याकडून तुला काय पाहिजे? तू आपल्या वडीलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.”तेव्हा इस्राएलच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, आम्ही तुझ्याकडे आलो आहोत कारण मवाबांचा पराभव करायला आम्हा तीन राजांना परमेश्वराने एकत्र आणले आहे. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे.”

2 राजे 5:16

पण अलीशा त्यांना म्हणाला, “मी परमेश्वराचा सेवक आहे आणि त्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतीही भेट वगैरे घेणार नाही.”आपल्या भेटीचा स्वीकार करावा म्हणून नामानने अलीशाला परोपरीने विनवले पण अलीशाचा नकारच होता.

2 राजे 5:26

अलीशा त्याला म्हणाला, “हे खरे नव्हे, नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे ह्दय तुझ्यापाशीच होते. पैसाअडका, कपडेलत्ते जैतूनाची फळे, द्राक्षे, शेळ्या, गायी, किंवा दास दासी भेटी दाखल घेण्याची ही वेळ नव्हे.

स्तोत्रसंहिता 119:46

मी तुझ्या कराराबद्दल राजांजवळ बोलेन आणि ते मला शरमिंदे करणार नाहीत.

दानीएल 2:6

पण तुम्ही मला माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितलात, तर मी तुम्हाला भेटी, बक्षिसे देईन. तुमचा सन्मान करीन. तेव्हा आता माझे स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.

दानीएल 5:29

मग बेलशस्सरने दानीएलला महावस्त्रे देण्याचा हुकूम दिला. त्याने दानीएलला सोन्याची साखळी व राज्यैंतील तिसऱ्या क्रमांकाचे पद दिले. त्याच रात्री, खास्द्यांचा राजा, बेलशस्सर याला ठार मारण्यात आले

प्रेषितांचीं कृत्यें 8:20

पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुइया पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास!

Interlinear

Choose Theme