Home Bibles निर्गम 11:3 · मराठी बायबल
निर्गम 11:3 · मराठी बायबल

मिसरच्या लोकांनी तुम्हाशी दयाळूपणे वागावे व तुम्हाला त्या वस्तू द्याव्यात अशी परमेश्वर त्यांची मने वळवील. मिसरचे सर्व लोक आणि फारोचे सेवक देखील मोशे महान माणूस असल्याचे अगोदर पासून मानीत होते.”‘

Cross references

उत्पत्ति 12:2

मी तुला आशीर्वाद देईन; तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुझे नाव मोठे करीन, लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील,

उत्पत्ति 39:21

परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता; आणि योसेफावर परमेश्वराची दया सतत राहिली; काही काळानंतर तुरुंगाच्या अधिकाऱ्यास योसेफ आवडूं लागला.

निर्गम 3:21

आणि मिसरचे लोक तुम्हा इस्राएल लोकांवर दया करतील असे मी करीन. तेव्हा तुम्ही निघताना मिसरचे लोक तुम्हाला पुष्कळ बक्षिसे व भेट वस्तु देतील.

निर्गम 12:36

मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना त्या त्या वस्तू दयाव्यात म्हणून त्यांच्या मनात परमेश्वराने इस्राएल लोकांविषयी दया निर्माण केली आणि म्हणून मिसरच्या लोकांनी इस्राएल लोकांना मौल्यवान वस्तू दिल्या.

अनुवाद 34:11

मिसरमध्ये महान चमत्कार करुन दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसरमध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले.

यहोशवा 4:14

सर्व इस्राएल लोकांच्या मनात त्या दिवशी परमेश्वराने यहोशवाबद्दल थोर असे महत्व बिंबवले. तेव्हापासून पुढे त्याचे आयुष्य असेपर्यंत त्यांनी मोशे प्रमाणेच यहोशवाविषयी आदर बाळगला.

2 शमुवेल 7:9

तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.

एस्तेर 9:4

मर्दखय राजवाड्यातील अतिमहत्वाची व्यक्ती झाला होता. त्याचे नांव राज्यातील सर्वापर्यंत पोचले होते आणि ते सगळे त्याचे महत्व जाणून होते. मर्दखयचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.

स्तोत्रसंहिता 106:46

इतर देशांनी त्यांना कैदी बनवले पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.

यशया 60:14

पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील. पूर्वी ज्यांनी तुझा तिरस्कार केला तेच आता तुझ्या पायाशी वाकतील. तेच लोक तुला ‘परमेश्वराची नगरी,’ ‘इस्राएलच्या पवित्र देवाचे सियोन म्हणून संबोधतील.”‘

प्रेषितांचीं कृत्यें 7:22

इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व कृतीत भारदस्त झाला.

प्रकटीकरण 3:9

जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वत:ला यहूदी समजतात पण ते यहूदीनाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन. आणि त्यांना समजेल की मीतुमच्यावर प्रीति केली आहे.

Interlinear

Choose Theme