Home Bibles यहेज्केल 20:28 · मराठी बायबल
यहेज्केल 20:28 · मराठी बायबल

पण तरीसुद्धा, त्यांना कबूल केलेल्या प्रदेशात मी त्यांना आणले. त्यांनी टेकड्या व हिरवीगार झाडे पाहिली आणि ते त्या सर्व ठिकाणी पूजा करण्यासाठी गेले. त्यांनी त्यांच्याबरोबर बळी आणि संतापदायक नैवेद्य नेले सुंदर गंध निर्माण करणारे यज्ञ त्यांनी केले, त्यांनी तेथे पेये अर्पण करण्यासाठी नेली.

Cross references

उत्पत्ति 15:18

म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले व त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो;

उत्पत्ति 26:3

तू तेथे राहा आणि मी तेथे तुझ्याबरोबर असेन; मी तुला आशीर्वादित करीन; ही सर्व भूमी मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन; तुझा बाप अब्राहाम याला मी जे जे देण्याचे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन.

लेवीय 17:5

ह्या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.

यहोशवा 23:3

परमेश्वराने आपल्या शत्रूंची काय परिस्थिती करुन टाकली ते तुम्ही पाहीले. आपल्याला मदत करण्याच्या उद्देशाने त्याने ते केले. तुमचा परमेश्वर देव तुमच्यासाठी लढला.

यहोशवा 23:14

“माझी अखेर आता जवळ येऊन ठेपली आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी बऱ्याच महान गोष्टी केल्या हे तुम्ही जाणता व खरोखरच त्यावर विश्वास ठेवता. त्याने दिलेला शब्द पाळण्यात कुठेही कसूर केली नाही हे तुम्हाला माहीत आहेच. आपल्याला दिलेले प्रत्येक वचन त्याने पुरे केले.

2 राजे 17:9

इस्राएल लोकांनी परमेश्वर देवाविरुध्द ज्या गोष्टी चोरुन केल्या त्या निषिध्द होत्या.लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थानावरील पुजास्थळे बांधली.

2 राजे 17:10

प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार झाडाखाली त्यांनी स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब उभारले.

2 राजे 17:12

त्यांनी मूर्तीपूजा आरंभली. “ती कधीही करु नये” म्हणून परमेश्वराने त्यांना बजावले होते.

नहेम्या 9:22

हे परमेश्वरा, त्यांना तू राज्ये आणि राष्टे दिलीस. फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस. हेशबोनच्या राजाचा म्हणजे सिहोनचा प्रांत त्यांना मिळाला. बाशानचा राजा ओग याचा भूभाग त्यांना मिळाला.

स्तोत्रसंहिता 78:55

देवाने इतर देशांना ती जमीन सोडून जायला भाग पाडले. देवाने प्रत्येक कुटुंबाला जमिनीचा त्यांचा हिस्सा दिला. देवाने इस्राएलाच्या प्रत्येक कुटुंबाला राहायला स्व:तचे घर दिले.

स्तोत्रसंहिता 78:58

इस्राएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले. त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली.

स्तोत्रसंहिता 105:8

परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा. हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.

यशया 57:5

तुम्हाला प्रत्येकाला हिरव्या झाडाखाली फक्त खोट्या देवांची पूजा करायची आहे. प्रत्येक झऱ्याकाठी तुम्ही मुले ठार मारता आणि खडकाळ प्रदेशात त्यांचे बळी देता.

यशया 65:7

“तुमची आणि तुमच्या वडिलांची पापे सारखीच आहेत.” परमेश्वर म्हणतो, “त्यांनी डोंगरावर धूप जाळून ही पापे केली. त्या टेकड्यांवर त्यांनी माझी अप्रतिष्ठा केली म्हणून मी त्यांना प्रथम शिक्षा केली. त्यांना मिळायला हवी होती तीच शिक्षा मी त्यांना दिली.”

यिर्मया 2:7

परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेल्या उत्तम प्रदेशात आणले. तुम्हाला तेथे पिकणारी फळे व धान्य खायला मिळावे म्हणून मी हे केले. पण तुम्ही माझी ही भूमी ‘गलिच्छ’ केली. मी तुम्हाला दिलेली ही भूमी तुम्ही खराब केली.

यिर्मया 3:6

योशीया यहुदावर राज्य करीत असताना, परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, इस्राएलने केलेली दुष्कृत्ये तू पाहिलीस ना? तिने माझा कसा विश्वासघात केले ते तू पाहिलेस. तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तींबरोबर व्यभिचार करुन पाप केले.

यिर्मया 32:30

मी इस्राएल आणि यहूदा येथील लोकांवर नजर ठेवली. ते करीत असलेली प्रत्येक गोष्ट वाईट आहे. ते लहान असल्यापासून दुष्कृत्ये करीत आहेत. इस्राएलच्या लोकांनी मला फार संतापविले. त्यांनी स्वत:च्या हाताने तयार केलेल्या मूर्तींची पूजा केल्याने मला अतिशय राग आला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यहेज्केल 6:13

आणि तेव्हाच तुम्हाला मीच परमेश्वर आहे हे कळेल, जेव्हा तुमची प्रेते, तुमच्या घाणेरड्या मूर्ती आणि तुमच्या वेदी यांच्यापुढे पडतील, तेव्हाच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे समजून येईल. उंच टेकड्या, पर्वत, हिरवी झाडे, दाट पालवीची एलाची झाडे अशा ठिकाणी म्हणजेच तुमच्या पूजेच्या प्रत्येक ठिकाणी प्रेते पडतील. ह्या सर्व ठिकाणी तुम्ही बळी अर्पण केले आणि घाणेरड्या मूर्तींपुढे सुवासिक धूप जाळला.

यहेज्केल 16:19

मी तुला भाकरी, मध व तेल दिले. तेही तू त्या मूर्तींना दिलेस. तू खोट्या देवांनी प्रसन्न व्हावे म्हणून सुगांधित द्रव्ये म्हणून ह्या सर्व गोष्टी त्यांना अर्पण केल्यास. त्या खोट्या देवांबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

यहेज्केल 16:24

“ह्या सर्व गोष्टीनंतर, तू त्या खोट्या देवांना पूजण्यासाठी मातीचा ढिगारा रचलास. प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर तू अशी पूजास्थाने बांधलीस.

यहेज्केल 20:6

त्याच दिवशी, त्यांना मिसरमधून बाहेर काढून, मी त्यांना देत असलेल्या भूमीकडे घेऊन जाण्याचेही कबूल केले. ती भूमी अनेक चांगल्या गोष्टीनी भरलेली होती.सर्व देशांपेक्षा हा देश सुंदर होता.

यहेज्केल 20:15

वाळवंटात त्या लोकांना मी आणखी एक वचन दिले. ते असे जी भूमी मी त्यांना देत होतो, तेथे मी त्यांना नेणार नाही. ती समृध्द भूमी होती. तो प्रदेश सर्व देशांपेक्षा सुंदर होता.

Interlinear

Choose Theme