Home Bibles यहेज्केल 20:27 · मराठी बायबल
यहेज्केल 20:27 · मराठी बायबल

तेव्हा मानवपुत्रा, आता इस्राएलाच्या लोकांशी बोल ‘परमेश्वर, माझा देव पुढील गोष्टी सांगतो, असे साग: इस्राएलच्या लोकांनी माझी निंदा केली आणि माझ्याविरुद्ध कट रचले.

Cross references

यशया 65:7

“तुमची आणि तुमच्या वडिलांची पापे सारखीच आहेत.” परमेश्वर म्हणतो, “त्यांनी डोंगरावर धूप जाळून ही पापे केली. त्या टेकड्यांवर त्यांनी माझी अप्रतिष्ठा केली म्हणून मी त्यांना प्रथम शिक्षा केली. त्यांना मिळायला हवी होती तीच शिक्षा मी त्यांना दिली.”

यहेज्केल 2:7

मी तुला सांगितलेल्या गोष्टी तू त्यांना सांगितल्या पाहिजेस. ते तुझे ऐकणार नाहीत, हे मला माहीत आहे. ते पापापासून परावृत्त होणार नाहीत का? कारण ते बंडखोर आहेत.

यहेज्केल 3:4

त्या नंतर देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांकडे जा. त्यांना माझे शब्द ऐकव.

यहेज्केल 3:11

मग परागंदा झालेल्या तुझ्या सर्व लोकांना जाऊन सांग, ‘परमेश्वराने, आपल्या प्रभूने पुढील गोष्टी सांगितल्या:’ ते तुझे ऐकणार नाहीत. पाप करायचे थांबवणार नाहीत, तरी तू ह्या गोष्टी सांगच.”

यहेज्केल 3:27

मी तुझ्याशी बोलेन आणि नंतर तुला बोलण्याची परवानगी देईन. पण तू त्यांना ‘परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो’ असे सांगितलेच पाहिजे. एखाद्याने ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा, न ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा! ते लोक नेहमीच माझ्याविरुद्व वागतात.

यहेज्केल 18:24

“कदाचित् भला माणूस चांगुलपणा सोडून देईल. वाईट माणसाने पूर्वी केलेली भयानक दुष्कृत्ये तो करील व सन्मार्ग सोडील. (असा माणूस जिवंत राहील का?) अशा रीतीने, त्या माणसाने वाईट मार्गाला लागून दुष्कृत्ये केल्यास, त्याच्या पूर्वीच्या सत्कृत्यांची आठवण देव ठेवणार नाही. तो देवाविरुद्ध वागून पापे करु लागला, हेच देवाच्या लक्षात राहील. म्हणून तो त्याच्या पापांचे फळ भोगेल. म्हणजेच मरेल.”

यहेज्केल 39:26

पूर्वी माझ्या विरुद्ध केलेल्या दुष्टाव्याची लोकांना लाज वाटेल. ते माझ्याविरुद्ध गेले ते सर्व विसरतील. ते त्यांच्या देशात सुरक्षितपणे राहतील. त्यांना कोणीही घाबरविणार नाही.

रोमकरांस 2:24

शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुमच्यामुळे ‘विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.”

प्रकटीकरण 13:5

त्या श्र्वापदाला मोठ्या अवास्तव गोष्टी बोलण्याची मुभा देण्यात आली व देवाविरुद्ध अनेक दुर्भाषणयुक्त गोष्टी तो बोलला.त्या प्राण्याला बेचाळीस महिने त्याचे सामर्थ्य वापरण्यास सांगण्यात आले.

Interlinear

Choose Theme