Home Bibles यहेज्केल 16:19 · मराठी बायबल
यहेज्केल 16:19 · मराठी बायबल

मी तुला भाकरी, मध व तेल दिले. तेही तू त्या मूर्तींना दिलेस. तू खोट्या देवांनी प्रसन्न व्हावे म्हणून सुगांधित द्रव्ये म्हणून ह्या सर्व गोष्टी त्यांना अर्पण केल्यास. त्या खोट्या देवांबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

Cross references

उत्पत्ति 8:21

परमेश्वराने त्या अर्पणाचा सुवास घेतला आणि त्याने त्याला आनंद झाला; परमेश्वर स्वत:स म्हणाला, “मानवास शिक्षा करण्याकरिता मी पुन्हा कधीही भूमिला असा शाप देणार नाही; आपल्या लहानपणापासूनच मानव दुष्ट आहे; तेव्हा येथून पुढे कधीही मी पृथ्वीवरुन सर्वसजीव सृष्टीचा नाश करणार नाही पुन्हा;

अनुवाद 32:14

गाईम्हशींचे, शेळ्यामेंढ्याचे लोणी, आणि दूध, पुष्ट मेंढ्या व कोकरे, बाशानचे उत्तम प्रतीचे बकरे, उत्कृष्ट गहू हे परमेश्वराने त्यांना दिले. द्राक्षाची लाल मदिराही इस्राएलांनो, तुम्ही प्यायलात.

यिर्मया 3:24

त्या भयानक खोट्या देवाने बआल देवताने आमच्या वडिलांच्या मालकीचे सर्व काही खाल्ले आहे. त्या खोट्या दैवताने आमच्या पूर्वजांची मुले व मुली गिळली. आमच्या तारुण्यापासून हे घडले. त्या भयानक खोट्या देवाने आमच्या वडिलांच्या मेंढ्या आणि गुरे आणि त्यांची कोकरे व वासरे घेतली.

यहेज्केल 7:20

“त्या लोकांनी आपल्या सुंदर दागिन्यांचा उपयोग करुन मूर्ती घडविली. त्यांना त्याचा अभिमान वाटत होता. त्यांनी भयानक मूर्ती बनविल्या. त्यांनी अशा घाणेरड्या वस्तू तयार केल्या. म्हणून मी (देव) त्यांना घाणेरड्या लक्तराप्रमाणे दूर फेकून देईन.

यहेज्केल 16:13

तू तुझ्या सोन्या-चांदीच्या अलंकारात व ताग, रेशीम यांच्या कशिदा काढलेल्या वस्त्रांत फारच सुंदर दिसत होतीस. तू चांगल्यातले चांगले अन्न खाल्लेस. तुझे सौंदर्य अप्रतिम होते. तू राणी झालीस!

होशेय 2:8

“तिला धान्य, मद्य आणि तेल देणारा मीच एकमेच (परमेश्वर) आहे, हे तिला (इस्राएलला) कळले नाही. मी तिला आणखी चांदी-सोने देत राहिलो पण इस्राएली लोकांनी त्या चांदी-सोन्याचा उपयोग बआलच्या मूर्ता घडविण्याकरिता केला.

होशेय 2:10

आता मी तिला उघडी करीन. ती नग्न होईल व तिचे सर्व प्रियकर तिला पाहू शकणार नाही.

Interlinear

Choose Theme