Home Bibles यिर्मया 2:7 · मराठी बायबल
यिर्मया 2:7 · मराठी बायबल

परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेल्या उत्तम प्रदेशात आणले. तुम्हाला तेथे पिकणारी फळे व धान्य खायला मिळावे म्हणून मी हे केले. पण तुम्ही माझी ही भूमी ‘गलिच्छ’ केली. मी तुम्हाला दिलेली ही भूमी तुम्ही खराब केली.

Cross references

लेवीय 18:24

“असल्याप्रकारच्या पाप कर्मामुळे स्वत:ला अशुद्ध करुन घेऊ नका! कारण मी राष्ट्रांना त्यांच्या देशातून बाहेर घालवून देत आहे, आणि तो देश मी तुम्हाला देत आहे! कारण तेथील लोकांनी असली भंयकर पापकर्में केली!

लेवीय 18:25

म्हणून त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे! आणि आता तो तेथील रहिवाशांना, ओकून बाहेर टाकीत आहे!

गणना 13:27

ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हाला पाठवलेस त्या प्रदेशात आम्ही गेलो. तो प्रदेश अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेलाआहे. त्या प्रदेशात होणारी ही काही फळे पाहा.

गणना 14:7

या दोघांनी तिथे जमलेल्या इस्राएल लोकांना सांगितले, “आम्ही जो प्रदेश बघितला तो खूप चांगला आहे.

गणना 35:33

“तुमच्या प्रदेशाला निष्पाप रक्ताने भ्रष्ट करु नका जर एखाद्याने कुणाचा खून केला तर त्या अपराधासाठी असलेली एकमेव शिक्षा म्हणजे त्या खुन्याला ठार मारणे. त्याशिवाय त्याप्रदेशाची त्या अपराधपासून सुटका होऊच शकत नाही.

अनुवाद 6:10

“अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना तुम्हांला हा देश देण्याचे तुमचा देव परमेश्वर ह्याने वचन दिले होते. तो तुम्हांला मिळेल. तुम्ही स्वत: वसवलेली नाहीत अशी मोठी, समृध्द नगरे तो तुम्हाला देईल.

अनुवाद 6:18

उचित आणि चांगले आहे तेच करा. त्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो. त्याने तुमचे कल्याण होईल. परमेश्वराने जो चांगला प्रदेश तुम्हांला द्यायचे तुमच्या पूर्वजांना कबूल केले आहे, त्यात तुमचा प्रवेश होईल.

अनुवाद 8:7

तुमचा देव परमेश्वर तुम्हाला उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्यानाले आहेत.

अनुवाद 8:8

ही जमीन गहू, जव, द्राक्षमळे, अंजीर, डाळिंब यांनी समृद्ध आहे. येथे जैतून तेल, मध यांची रेलचेल आहे.

अनुवाद 11:10

तुम्ही जिथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही पेरणी झाल्यावर भाजीचा मळा शिंपावा तसे पायाने कालव्याचे पाणी ओढून देत होता.

अनुवाद 21:23

तेव्हा ते रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नका. त्याचदिवशी कटाक्षाने त्याचे दफन करा. कारण झाडाला टांगलेल्या त्या मृतदेहाला देवाचा शाप असतो. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेली भूमी अशी विटाळू नका.

अनुवाद 32:9

परमेश्वराचा वाटा त्याचे लोक होय. याकोब परमेश्वराचा आहे.

नहेम्या 9:25

त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला. सुपीक प्रदेश त्यांनी मिळवला, उत्तम वस्तूनी भरलेली घरे त्यांना मिळाली खोदलेल्या विहिरी त्यांना आयत्या मिळाल्या. द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे त्यांना मिळाली, खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले. तू त्यांना दिलेल्या मनोहारी गोष्टीचा त्यांनी उपभोग घेतला.

नहेम्या 9:26

आणि मग ते तुझ्यावर उलटले. तुझ्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला, त्यांनी तुझ्या संदेष्ठ्यांचा वध केला. या संदेष्ट्यांनी लोकांना सावध केले होते. त्यांना ते परत तुझ्या मार्गावर आणू पाहात होते. पण आमच्या पूर्वजांनी मात्र तुझ्याविरुद्ध भयंकर दुराचरण केले.

स्तोत्रसंहिता 78:58

इस्राएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले. त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली.

स्तोत्रसंहिता 106:38

देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले. त्यांनी स्वतच्या मुलांना ठार मारले आणि त्यांना त्या खोट्या देवाला अर्पण केले.

यशया 19:25

सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या देशांवर कृपा करील. तो म्हणेल, “मिसरवासीयांनो, तुम्ही माझे आहात अश्शूरच्या रहिवाशांनो, तुम्हाला तर मीच घडवलय्! इस्राएलच्या लोकांनो, मी तर तुमचा स्वामी आहे. तुम्हासर्वांना माझे आशीर्वाद!”

यिर्मया 3:1

“एखाद्याने बायकोशी घटस्फोट घेतल्यास ती त्याला सोडते आणि दुसऱ्याशी लग्न करते. मग तो माणूस परत आपल्या बायकोकडे जाऊ शकतो का? नाही. जर तो माणूस त्या बाईकडे परत गेलातर तो देश ‘भ्रष्ट’ होतो. यहूदा, खूप प्रियकर (खोटे देव) असलेल्या वारांगनेप्रमाणे तू वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे.” हा परमेश्वराचा संदेश होता.

यिर्मया 3:9

आपण वारांगनेप्रमाणे वागत आहोत ह्याची यहूदाला पर्वा नव्हती म्हणून तिने तिचा देश ‘भ्रष्ट’ केला. दगड आणि लाकूड यांपासून तयार केलेल्या मूर्तींची पूजा करुन तिने व्यभिचाराचे पाप केले.

यिर्मया 16:18

ती यहूदाच्या लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल परत फेड करीन. मी यहूदाच्या लोकांना त्याच्या पापांची किंमत दामदुपटीने मोजायला लावीन. त्यांनी माझी भूमी ‘अपवित्र’ केली म्हणून मी असे करीन. त्यांनी भयानक मूर्ती स्थापून माझी भूमी कलंकित केली. मी त्या मूर्तींचा तिरस्कार करतो. पण त्यांनी माझा देशच त्या मूर्तींनी भरुन टाकला.”

यहेज्केल 20:6

त्याच दिवशी, त्यांना मिसरमधून बाहेर काढून, मी त्यांना देत असलेल्या भूमीकडे घेऊन जाण्याचेही कबूल केले. ती भूमी अनेक चांगल्या गोष्टीनी भरलेली होती.सर्व देशांपेक्षा हा देश सुंदर होता.

यहेज्केल 20:24

“इस्राएल लोकांनी माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी माझ्या नियमाप्रमाणे वागायचे नाकारले. माझ्या सुटृ्यांच्या विशेष दिवसांना त्यांनी महत्व दिले नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या अमंगळ मूर्तीचीच पूजा केली.

यहेज्केल 23:35

“म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो ‘यरुशलेम, तू मला विसरलीस. तू मला दूर ढकललेस. मला मागे ठेवले तेव्हा माझा त्याग केल्याबद्दल आणि वेश्येप्रमाणे वागल्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. तुझ्या दुष्ट स्वप्नांमुळे आणि दुराचारामुळे तुला भोग भोगलेच पाहिजेत.”

यहेज्केल 36:17

“मानवपुत्रा, इस्राएलचे लोक त्यांच्या स्वत:च्या देशात राहिले. पण दुष्कृत्ये करुन त्यांनी तो देश गलिच्छ केला. रजस्वला स्त्रीप्रमाणे ते मला अशौच होते.

मीखा 2:10

उठा आणि चालते व्हा! ही तुमची विसाव्याची जागा असणार नाही. का? कारण तुम्ही ही जागा उद्ध्वस्त केलीत. तुम्ही ती अस्वच्छ केलीत. म्हणून तिचा नाश होईल. आणि तो विनाश भयंकर असेल.

Interlinear

Choose Theme