Home Bibles 2 राजे 17:9 · मराठी बायबल
2 राजे 17:9 · मराठी बायबल

इस्राएल लोकांनी परमेश्वर देवाविरुध्द ज्या गोष्टी चोरुन केल्या त्या निषिध्द होत्या.लहान गावापासून मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी त्यांनी उंचस्थानावरील पुजास्थळे बांधली.

Cross references

अनुवाद 13:6

“तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हांला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, ‘चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु.’ (तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकिवातही नसलेले हे दैवत असेल

अनुवाद 27:15

“मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो. या मूर्ती म्हणजे कोणा कारागिराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वराला अशा गोष्टींचा तिटकारा आहे! “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

2 राजे 18:8

थेट गज्जा आणि त्याच्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. लहान खेड्यापासून मोठ्या नगरापर्यंत सर्व पलिष्टी गावे त्याने जिंकली.

ईयोब 31:27

सूर्य, चंद्राची पूजा करण्याइतका मूर्ख मी कधीच नव्हतो.

स्तोत्रसंहिता 78:58

इस्राएलाच्या लोकांनी प्रार्थनेसाठी उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले. त्यांनी चुकीच्या देवाचे पुतळे केले आणि देवाला असूया आणली.

यशया 29:15

ते लोक परमेश्वरापासून काही लपविण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांची दुष्कृत्ये अंधारात करतात. ते लोक स्वत:शीच म्हणतात, “आम्हांला कोणीही पाहू शकत नाही. आम्ही कोण आहोत हे कोणालाही माहीत नाही.”

यहेज्केल 8:12

देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलधारे अंधारात काय करीत आहेत. हे तुला दिसतेच ना? प्रत्येक माणसाला त्याच्या खोट्या देवासाठी वेगळी खोली आहे. ते लोक मनाशी म्हणतात ‘परमेश्वर आम्हाला पाहू शकत नाही. परमेश्वराने ह्या देशाचा त्याग केला.”‘

यहेज्केल 20:28

पण तरीसुद्धा, त्यांना कबूल केलेल्या प्रदेशात मी त्यांना आणले. त्यांनी टेकड्या व हिरवीगार झाडे पाहिली आणि ते त्या सर्व ठिकाणी पूजा करण्यासाठी गेले. त्यांनी त्यांच्याबरोबर बळी आणि संतापदायक नैवेद्य नेले सुंदर गंध निर्माण करणारे यज्ञ त्यांनी केले, त्यांनी तेथे पेये अर्पण करण्यासाठी नेली.

होशेय 12:11

पण गिलादाच्या लोकांनी पाप केले आहे. तेथे पुष्कळ भयानक मूर्ता आहेत. गिल्गालमध्ये लोक बैलांना बळी अर्पण करतात. त्यांच्या अनेक वेदी आहेत. नांगरलेल्या शेतात ज्याप्रमाणे ढेकळांच्या रांगा असतात, त्याप्रमाणे त्यांच्या वेदींच्या रंगाच्या रांगा आहेत.

Interlinear

Choose Theme