Home उत्पत्ति 36 · मराठी बायबल

उत्पत्ति

Chapter 36

मराठी बायबल
1एसाव (म्हणजे ‘अदोम’) याची वंशावळ
2एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे - एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हिळी याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा
3आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.
4एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते.
5आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले.
6याकोब व एसाव यांच्या कुटुंबांची एवढी वाढ झाली की कनान देश सर्वांना पुरेनासा झाला म्हणून एसाव आपला भाऊ याकोब याजपासून बाजूला निघाला; तो आपल्या बायका, मुले, मुली तसेच सर्व नोकर चाकर, गाईगुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळवलेली धनसंपत्ती व मालमत्ता हे सर्व घेऊन सेईर या डोंगराळ प्रदेशाकडे गेला.
7
8
9एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ:
10एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल.
11अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज;
12अलीपाज याची तिम्ना नावांची एक गुलामस्त्री होती; तिम्ना व अलीपाज यांना एक मुलगा झाला; त्याचे नाव अमालेक.
13रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती.बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले.
14सिबोनाचा मुलगा अना याची मुलगी अहलीबामा ही एसावाची तिसरी बायको होती. यऊश, यालाम व कोरह हे एसाव व अहलीबामा यांचे मुलगे होते.
15एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे -एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज
16कोरह, गाताम व अमालेख;हे आपापल्या कुळांचे प्रमुख एसावास त्याची बायको आदा हिच्या पोटी झाले.
17एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे - नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा;हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले.
18एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले;
19हे सर्व पुरुष एसावापासून (अदोमपासून) झालेल्या कुळांचे नेते होत.
20एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे - लोटन, शोबाल, सिबोन,
21अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले.
22लोटानाचे मुलगे होते होरी व हेमाम. (तिम्ना ही लोटानाची बहीण होती.)
23शोबालाचे मुलगे अलवान, मानहाथ, एबाल, शपो व ओनाम.
24सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या व अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.)
25अनाचा मुलगा दिशोन व अनाची मुलगी अहलीबामा.
26दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान.
27एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते.
28दीशानाला ऊस व अरान हे दोन मुलगे होते.
29होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी - लोटान, शोबाल, सिबोन, अना,
30दीशोन, एसर व दीशान, यहूदा प्रांताच्या पूर्वे कडील सेईर (अदोम) प्रदेशात राहाणाऱ्या आपापल्या कुळांचे हे प्रमुख झाले.
31इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते.
32बौराचा मुलगा बेला याने अद्रोमावर राज्य केले; दिन्हाबा नगर ही त्याची राजधानी होती.
33बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.
34योबाब मेल्यावर तेमानी लोकांच्या देशाचा हुशाम याने त्याच्या जागी राज्य केले.
35हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती.
36हदाद मेल्यावर मास्त्रेका येथील साम्ला याने त्या देशावर राज्य केले.
37साम्ला मेल्यावर फरात (युफ्रेटीस) नदीवर असलेल्या रहोबोथ येथील शौल याने त्या देशावर राज्य केले.
38शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल - हानान याने त्या देशावर राज्य केले.
39बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. पाऊ हा त्याची राजधानी होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.
40एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या प्रमुखांची नावे-तिम्ना, आल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पीनोन, कनाज तेमान, मिब्सार, माग्दीएल व ईराम हयातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले.
41
42
43
Bible Study with Steffi App

Memorize verses with spaced repetition. Free, no ads, 15+ languages.

Download Free ↗

Choose Theme