मी यहूद्यांच्या लोकांना सामर्थ्यवान बनवीन. योसेफच्या वंशाला युध्द जिंकण्यास साहाय्य करीन. आणि त्यांना सुरक्षितपणे व सुखरुप परत आणीन. त्यांचे सांत्वन करीन आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना मदत करीन.
Cross references
मी दावीदला माझ्या उजव्या हाताने आधार दिला आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले.
पुढील काळात, परमेश्वर याकोबाला प्रेमाची पुन्हा प्रचिती देईल. तो इस्राएली लोकांची पुन्हा निवड करील. तो त्यांना त्यांची जमीन परत देईल. यहुद्यां व्यतिरिक्त अन्य लोक त्यांना येऊन मिळतील. ते एकत्र होतील आणि त्यांचा एकच वंश याकोबाचा वंश होईल.
काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.
“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
तुझी मुले तुझ्याकडे परत येतील. लोकांनी तुझा पराभव केला पण ते लोक तुला एकटी सोडतील.”
त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
त्या चांगल्या ‘अंकुराच्या’ काळात यहूदातील लोक वाचतील आणि इस्राएल सुरक्षित राहील. त्याचे नाव असेल परमेश्वर आमचा चांगुलपणा.
परमेश्वर म्हणतो, “सध्या याकोबाची माणसे बंदिवासात आहेत. पण ती परत येतील. याकोबाच्या घरांची मला दया येईल. सध्या नगरी म्हणजे पडक्या इमारतींनी भरलेली टेकडी आहे. पण नगरी पुन्हा बांधली जाईल. राजाचा राजवाडाही योग्य जागी बांधला जाईल.
“याकोबाचे घराणे पूर्वीच्या इस्राएलच्या घराण्याप्रमाणे होईल. मी, इस्राएल आणि यहूदा, यांना सामर्थ्यशाली करीन आणि त्यांना इजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन.
परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “त्या वेळी मी इस्राएलमधील सर्व कुळांचा देव असेन आणि ती सर्व माझी माणसे असतील.”
देव म्हणतो, “एफ्राईम माझा लाडका मुलगा आहे, हे तुम्हांला माहीतच आहे मी त्याच्यावर प्रेम करतो. हो! मी नेहमीच एफ्राईमवर टीका केली. पण तरीही मला त्याची आठवण येते. तो मला अतिशय प्रिय आहे आणि मी खरोखरच त्यांच्यावर दया करतो.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “मी इस्राएलच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करण्याची वेळ येत आहे.
परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली आणि तो तिचे रक्षण करतो, परमेश्वर हेच त्याचे नाव. परमेश्वर म्हणतो,
मी तुम्हाला खूप लोक व प्राणी देईन. त्यांची संतती वाढेल पूर्वीप्रमाणे लोक राहू लागतील. मी तुम्हाला, आरंभी होता त्यापेक्षा चांगले करीन. मग तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे.
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “इस्राएलचे लोक मला त्यांच्याकरिता पुढील गोष्टी करण्यास सांगतील: त्यांची संख्या मी पुष्कळ मोठी करावी. त्यांना मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे करावे.
“मानवपुत्रा, एक काठी घे आणि तिच्यावर पुढील संदेश लिही. ‘ही काठी यहूदा आणि त्याचे मित्रइस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’ मग दुसरी काठी घेऊन तिच्यावर लिही ‘ही एफ्राईमची काठी योसेफ व त्याचे मित्र इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “याकोबच्या लोकांना कैदेतून परत आणीन. इस्राएलच्या सर्व लोकांवर मी दया करीन. माझ्या पवित्र नावाबद्दल आवेशाने भावना प्रकट करीन.
पण मी यहूदावर दया करीन. मी यहूदा राष्टाला वाचवीन, त्यांना वाचविण्यासाठी मी धनुष्य नाही. किंवा तलवार, यांचा उपयोग करणार नाही. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर त्यांना तारीन.”
“मग यहूदाचे व इस्राएलचे लोक एकत्र येतील. ते त्यांच्यासाठी एक राजा निवडतील. त्याचे राष्ट भूप्रदेशापेक्षा खूपच मोठे असेल. तेव्हा इज्रेलचा दिवस खरोखर चांगला असेल.”
तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीजपेरीन. लो-रूमाहावर मी दया करीन. लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन. मग ते मला ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”
शहाण्या माणसाला या गोष्टी समजतात. चलाख माणसाने या गोष्टी शिकाव्या परमेश्वराचे मार्ग योग्य आहेत. त्यामुळे सज्जन जगतील व दुर्जन मरतील.
याकोबाचे घराणे आगीप्रमाणे होईल योसेफाचे घराणे जाळासारखे असेल पण एसावाचे राष्ट्रराखेप्रमाणे होईल यहुदाचे लोक अदोम जाळतील, ते अदोमचा नाश करतील. एसाव राष्ट्रात मग कोणी शिल्लक राहणार नाही.” का? कारण परमेश्वर देव असे म्हणाला आहे.
परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमला दुखापत झाली व ती लंगडी झाली. ती दूर फेकली गेली तिला दुखविले गेले व शिक्षा झाली. पण मी तिला माझ्याकडे परत आणीन.
“सियोनच्या कन्ये, ऊठ आणि त्या लोकांना चिरडून टाक. मी तुला खूप सामर्थ्यवान करीन. तुला जणू काही लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर असतील. तू पुष्कळांवर आघात करुन त्यांचे तुकडे तुकडे करशील. तू त्यांची संपत्ती परमेश्वराला देशील. तू त्याचे धन जगाच्या परमेश्वराला देशील.”
परमेश्वर, त्याच्या लोकांना, सोडून देईल. स्त्री आपल्या मुलाला, वचनदत राजाला जन्म देईपर्यंत.मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलच्या लोकांकडे परत येतील.
पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक, पुष्कळांना, जंगलातील प्राण्यांमधील सिंहाप्रमाणे वाटतील. मेंढ्यांच्या कळपांत आलेल्या तरुण सिंहाप्रमाणे ते असतील मेंढ्यांच्या कळपातून जर सिंह गेला, तर तो त्याला पाहिजे तेथेच जातो. त्याने जर एखाद्या जनावरावर हल्ला केला तर कोणीही त्या जनावराला वाचवू शकत नाही. वाचलेले लोक असेच असतील.
राष्ट्रे ते चमत्कार पाहून लज्जित होतील. माझ्या तुलनेत त्यांची “शक्ती” काहीच नाही, हे त्यांना दिसेल. ते विस्मयचकित होतील आणि आश्चर्याने तोंडावर हात ठेवतील. कान झाकून घेऊन ते ऐकण्याचे नाकारतील.
परमेश्वरा तुझ्यासारखा दुसरा देव नाही. पापी लोकांनाही तू क्षमा करतोस. तुझ्या वाचलेल्या लोकांनाही तू क्षमा करतोस. परमेश्वर अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणारा नाही. का? कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.
त्या वेळी, तुला हजा करणाऱ्यांना मी शिक्षा करीन. माझ्या इजा झालेल्या माणसांना मी वाचवीन. बळजबरीने दूर पळून जायला लागलेल्या माझ्या माणसांना मी परत आणीन. मी त्यांना कीर्ती मिळवून देईन. सर्व लोक त्यांची प्रशंसा करतील.
सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांतून मी माझ्या माणसांची मुक्तता करीत आहे.
पण आता तसे नाही. वाचलेल्यांची स्थिती तशी असणार नाही.” सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्यवान करील ते देवासाठी व त्याच्या नावासाठी जगातील. परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या.
मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.”‘
परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशत: कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.