Home Bibles यशया 41:10 · मराठी बायबल
यशया 41:10 · मराठी बायबल

काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.

Cross references

उत्पत्ति 15:1

या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”

उत्पत्ति 26:24

त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “इसहाका, तुझा बाप अब्राहाम याचा देव मी आहे; तर भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम याच्याकरिता तुला आशीर्वादित करीन.” आणि तुझा वंश खूप वाढवीन.

निर्गम 14:13

परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थित उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वाचवील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत.

अनुवाद 20:1

“तुम्ही शत्रूवर चाल करुन जाल तेव्हा त्यांचे घोडे, रथ आणि तुमच्यापेक्षा मोठे सैन्य पाहून घाबरुन जाऊ नका. कारण ज्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर काढले तो परमेश्वर देव तुमचा पाठीराखा आहे.

अनुवाद 31:6

शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही”

अनुवाद 33:27

देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ चालते!. तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. ‘शत्रूंना नष्ट कर’ असे तो म्हणतो.

यहोशवा 1:9

खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना? तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे.”

शास्ते 6:16

तेव्हा परमेश्वर गिदेनला म्हणाला, “मी तुझ्या बरोबर आहे तू मिद्यानी लोकांचा पराभव करू शकशील आपण एकाच माणसाशी लढत आहोत असे तुला वाटेल.”

2 शमुवेल 22:19

मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण देवाने मला आधार दिला.

1 इतिहास 12:18

अमासय हा तीस वीरांचा सरदार होता. त्याच्यात परमेश्वरी आत्म्याचा साक्षात्कार झाला आणि तो म्हणाला,“दावीदा, आम्ही तुझ्या बाजूचे आहोत इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत शांती असो! तुला साहाय्य करणाऱ्यांनाही शांती असो. कारण देव तुझा पाठीराखा आहे.”तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.

2 इतिहास 20:17

तुम्हाला या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हाला आढळून येईल. यहूदा आणि यरुशलेम लोक हो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.”

2 इतिहास 32:8

अश्शूरच्या राजाजवळ फक्त मनुष्यबळ आहे. आपल्या बाजूला मात्र साक्षात परमेश्वर देव आहे. तोच आपल्याला मदत करील.” आपल्या युध्दात तोच लढेल अशाप्रकारे हिज्कीयाचे धीराचे बोलणे ऐकून लोकांना त्यावर विश्वास बसला आणि त्यांना हुरुप आला.

स्तोत्रसंहिता 18:36

माझ्या पायांना आणि घोट्यांना तू शक्ती दिलीस. त्यामुळे मी न पडता चालू शकलो.

स्तोत्रसंहिता 27:1

परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही.

स्तोत्रसंहिता 29:11

परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो. परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.

स्तोत्रसंहिता 33:12

ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते लोक सुखी आहेत. देवाने त्यांची विशेष माणसं म्हणून निवड केली.

स्तोत्रसंहिता 37:17

का? कारण दुष्टांचा नाश होईल आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेईउ

स्तोत्रसंहिता 37:24

जर सैनिक पळत पळत त्याच्या शत्रूवर चढाई करत असेल तर परमेश्वर त्याचा हात धरुन त्याला पडताना सावरतो.

स्तोत्रसंहिता 41:12

मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास. तू मला उभे राहू दे, मग मी सदैव तुझी चाकरी करीन.

स्तोत्रसंहिता 46:1

देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमीमदत शोधू शकतो.

स्तोत्रसंहिता 46:7

तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या बरोबर आहे. याकोबाचा देव ही आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे.

स्तोत्रसंहिता 46:11

तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.

स्तोत्रसंहिता 63:8

माझा आत्मा तुला धरुन ठेवतो आणि तू माझा हात धरतोस.

स्तोत्रसंहिता 65:5

देवा, आम्हाला वाचव. चांगले लोक तुझी प्रार्थना करतात आणि तू त्यांच्या प्रार्थमेला उत्तर देतोस. तू त्यांच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतोस. सर्व जगभरचे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात.

स्तोत्रसंहिता 89:13

देवा, तुझ्याजवळ शक्ती आहे. तुझीशक्ती महान आहे. विजय तुझाच आहे.

स्तोत्रसंहिता 99:4

बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.

स्तोत्रसंहिता 144:8

हे शत्रू खोटारडे आहेत. ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

स्तोत्रसंहिता 144:11

मला या परक्यांपासून वाचव. हे शत्रू खोटारडे आहेत. ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

स्तोत्रसंहिता 145:14

जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो. जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो.

स्तोत्रसंहिता 147:12

यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर. सियोन तुझ्या देवाची स्तुती कर.

यशया 12:2

देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे. मी निर्भय आहे तो मला तारतो. परमेश्वर हीच माझी शक्तीआहे. तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.

यशया 35:4

लोक घाबरले व गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील.

यशया 40:29

परमेश्वर दुबळ्यांना सबळ व्हायला मदत करतो. तो लोकांना शक्तीशिवाय सामर्थ्यवान होण्यास कारणीभूत होतो.

यशया 41:13

मी परमेश्वर तुझा देव आहे, मी तुझा उजवा हात धरतो आहे, मी तुला सांगतो: घाबरू नकोस मी तुला मदत करीन.

यशया 43:1

याकोब, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएल, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस.

यशया 43:5

“म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सर्व मुलांना गोळा करून तुझ्याकडे आणीन, मी त्यांना पूर्व आणि पश्चिम दिशेकडून गोळा करीन.

यशया 44:2

मी परमेश्वर आहे. मी तुला निर्माण केले. तुला तुझे हे रूप देणारा मी आहे. तू आईच्या गर्भात असल्यापासून मी तुला मदत केली. याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नकोस. यशुरूना, मी तुझी निवड केली.

यशया 49:8

परमेश्वर म्हणतो, “माझी दया दाखविण्याची एक खास वेळ असेल. त्यावेळेला मी तुझ्या आळवणीची दखल घेईन. तुला वाचविण्याचा विशेष दिवस असेल. तेव्हा मी तुला मदत करीन. मी तुझे रक्षण करीन. माझा लोकांबरोबर झालेल्या कराराचा तू पुरावा असशील. देशाचा आता नाश झाला आहे पण ती जमीन तू ज्याची त्याला परत देशील.

यशया 51:12

परमेश्वर म्हणतो, “मीच तो एकमेव ज्याने तुमचे दु:ख हलके केले. मग तुम्ही लोकांना का भ्यावे? ती जन्म मृत्यु पावणारी माणसेच आहेत. ते फक्त मनुष्यप्राणी आहेत. ते गवताप्रमाणे मरतात.”

Interlinear

Choose Theme