Home Bibles यिर्मया 30:18 · मराठी बायबल
यिर्मया 30:18 · मराठी बायबल

परमेश्वर म्हणतो, “सध्या याकोबाची माणसे बंदिवासात आहेत. पण ती परत येतील. याकोबाच्या घरांची मला दया येईल. सध्या नगरी म्हणजे पडक्या इमारतींनी भरलेली टेकडी आहे. पण नगरी पुन्हा बांधली जाईल. राजाचा राजवाडाही योग्य जागी बांधला जाईल.

Cross references

1 इतिहास 29:1

राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “देवाने शलमोनाला निवडले आहे. शलमोन अजून कोवळा तरुण आहे. या कामासाठी काय करायला लागेल त्याची त्याला पूर्ण कल्पना नाही. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे घर काही सामान्य माणसाचे नव्हे; ते परमेश्वराचे देवाचे निवासस्थान आहे.

1 इतिहास 29:19

शलमोन तुझ्याशी एकनिष्ठ राहावा म्हणून त्याचे मन तुझ्याठायी स्थिर कर. तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे पालन त्याने करावे, या सर्व गोष्टी कराव्या आणि माझ्या नियोजित मंदिराची उभारणी त्याने करावी म्हणून त्याला सात्विक मन दे.”

एज्रा 6:3

कोरेश राजाच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, देवाचे मंदिर पुन्हा बांधले जावे. तेथे यज्ञ अर्पण करता यावेत. मंदिराचा पाया बांधून काढावा. मंदिराची उंची 90 फूट आणि रुंदी 90 फूट असावी.

नहेम्या 3:1

मुख्य याजकाचे नाव होते एल्याशीब. एल्याशीब आणि त्याचे याजक बांधव उठून कामाला लागले आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी पवित्र परमेश्वरासाठी प्रार्थनापूर्वक तिची प्रतिष्ठापना केली. दरवाजे भिंतीत बसवले. हमेयाचा बुरुज (म्हणजे शंभराचा बुरुज) आणि हनानेल बुरुज इथपर्यंत या याजकांनी यरुशलेमच्या तटबंदीचे काम केले. त्यांनी पवित्र परमेश्वरासाठी आपल्या कामाची प्रार्थनापूर्वक प्रतिष्ठापना केली.

नहेम्या 7:4

आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.

स्तोत्रसंहिता 78:69

देवाने त्याचे पवित्र मंदिर उंच पर्वतावर बांधले. देवाने त्याचे मंदिर पृथ्वीसारखे कायमचे राहील असे बांधले.

स्तोत्रसंहिता 85:1

परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव. याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत. कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.

स्तोत्रसंहिता 102:13

तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील. तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.

स्तोत्रसंहिता 102:14

तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात. त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.

यशया 44:26

परमेश्वर यरूशलेमला म्हणतो, “तुझ्यात परत लोक राहू लागतील.” परमेश्वर यहुदातील नगरांना म्हणतो, “तुमची पुनर्बांधणी होईल.” ज्या शहरांचा नाश झाला, त्या शहरांना परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला परत शहराचे रूप देईन.”

यशया 44:28

परमेश्वर कोरेशला म्हणतो, “तू माझा मेंढपाळ आहेस. मला पाहिजे ते तू करशील. तू यरूशलेमला म्हणशील, ‘तुझी पुनर्बांधणी केली जाईल. ‘तू मंदिराला सांगशील, ‘तुझा पाया परत घातला जाईल.”‘

यिर्मया 23:3

“मी माझ्या मेंढ्या (लोक) दुसऱ्या देशांत पाठविल्या पण ज्या मेंढ्या (लोक दुसऱ्या देशात गेल्या आहेत, त्यांना मी गोळा करीन. मी त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. त्या मेंढ्या (लोक) त्यांच्या कुरणात (देशात) परत आल्यावर, त्यांना पुष्कळ संतती होऊन त्यांची संख्या वाढेल.

यिर्मया 29:14

मी स्वत:ला तुमच्याकडून सापडवून घेईल.” हा परमेश्वराचा संदेश आहे “मी तुमची कैदेतून सुटका करीन. मी तुम्हाला ही जागा सोडायला लावली आता मी तुम्हाला ज्या ज्या राष्ट्रांत आणि प्रदेशात पाठविले होते तेथून गोळा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “आणि जेथून तुम्हाला मी कैदी म्हणून पकडून दूर नेण्यास भाग पाडले होते त्या जागी परत आणीन.”

यिर्मया 30:3

असे करण्याचे कारण असा काळ येईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “तेव्हा मी इस्राएल आणि यहूदा येथील माझ्या हद्दपार केलेल्या लोकांना परत आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत मी त्यांना परत वस्ती करु देईन. मग ती भूमी पुन्हा त्यांच्या मालकीची होईल.”

यिर्मया 31:4

“इस्राएल, माझ्या वधू, मी तुझी पुन्हा निर्मिती करीन. तुझ्यातून देश निर्माण करीन. तू तुझी खंजिरी उचलशील आणि मौजमजा करणाऱ्या इतर लोकांबरोबर नृत्यात सामील होशील.

यिर्मया 31:23

“सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांसाठी मी पुन्हा चांगल्या गोष्टी करीन. कैदी म्हणून नेलेल्या लोकांना परत आणीन. त्या वेळी, यहूदाच्या शहरांत व गावांत राहणारे सर्व लोक म्हणतील, ‘सदगृह, पवित्र पर्वतावर, परमेश्वर तुझे कल्याण करो!“

यिर्मया 31:38

“असे दिवस येत आहेत की, हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे परमेश्वरासाठी यरुशलेम नगरी पुन्हा उभारली जाईल. हानानेलच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या दारापर्यंत सगळी नगरी पुन्हा उभारली जाईल.

यिर्मया 31:40

ज्या दरीत प्रेते व राख टाकली जाते, ती परमेश्वराला पवित्र वाटेल. ह्यात पूर्वेकडच्या किद्रोन दरीपासून घोडे दाराच्या कोपऱ्यापर्यंतच्या पठाराचा समावेश असेल. हा सर्व प्रदेश परमेश्वराला पवित्र वाटेल. यरुशलेमचा पुन्हा कधीही विध्वंस केला जाणार नाही वा तिचा नाश होणार नाही.”

यिर्मया 32:44

लोक आपले धन वापरुन शेते खरेदी करतील. ते करारावर सह्या करतील आणि ते मोहोरबंद करतील. लोक खरेदीखतांवर सह्या करतील, तेव्हा इतर लोक साक्षी असतील. बन्यामीनच्या देशात, लोक पुन्हा जमीन विकत घेतील, यरुशलेम भोवतीच्या प्रदेशातील जमीन ते खरेदी करतील. यहूदातील शहरांत ते शेते विकत घेतील. त्याचप्रमाणे लोक डोगराळ प्रदेश पश्र्चिमेकडील डोंगरपायथा व दक्षिणेकडील वाळवंट येथेही लोक जमीन विकत घेतील. मी तुमच्या लोकांना परत घरी आणीन. मग असे घडून येईन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यिर्मया 33:7

यहूदा आणि इस्राएल यांना मी परत आणीन पूर्वीप्रमाणेच मी त्या लोकांना शक्तिशाली करीन.

यिर्मया 33:11

तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.

यिर्मया 46:27

“याकोब, माझ्या सेवका, घाबरु नकोस. इस्राएल, भिऊ नकोस. दुरच्या ठिकाणाहून मी तुला वाचवीन. निरनिराळ्या देशांत कैदी म्हणून नेलेल्या तुझ्या मुलांचे मी रक्षण करीन. याकोबला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. कोणीही त्याला भीती दाखविणार नाही.”

यिर्मया 49:6

“अम्मोनी लोकांना कैदी करुन नेले जाईल. पण एक वेळ अशी येईल की मी त्यांना परत आणीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यिर्मया 49:39

“पण भविष्यात, मी एलामला परत आणीन आणि तिच्याबाबतीत चांगल्या गोष्टी घडतील असे करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

यहेज्केल 7:20

“त्या लोकांनी आपल्या सुंदर दागिन्यांचा उपयोग करुन मूर्ती घडविली. त्यांना त्याचा अभिमान वाटत होता. त्यांनी भयानक मूर्ती बनविल्या. त्यांनी अशा घाणेरड्या वस्तू तयार केल्या. म्हणून मी (देव) त्यांना घाणेरड्या लक्तराप्रमाणे दूर फेकून देईन.

यहेज्केल 36:11

मी तुम्हाला खूप लोक व प्राणी देईन. त्यांची संतती वाढेल पूर्वीप्रमाणे लोक राहू लागतील. मी तुम्हाला, आरंभी होता त्यापेक्षा चांगले करीन. मग तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे.

हाग्गय 2:7

मी राष्ट्रांना धक्का देईन आणि मग प्रत्येक राष्ट्र तुमच्याकडे संपत्ती घेऊन येईल मग हे मंदिर वैभवाने भरुन टाकीन. सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे.

जखऱ्या 1:16

म्हणून परमेश्वर म्हणतो, “मी यरुशलोमला परत येईन आणि दया करुन तिचे दु:ख हलके करीन.” सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमची पुन्हा उभारणी केली जाईल आणि तिथे माझे निवासस्थान बांधले जाईल.”

जखऱ्या 12:6

त्यावेळी मी यहूद्यांच्या नेत्यांना वणव्याप्रमाणे बनवीन. वणव्यात गवताची काडी जशी भस्मसात होते, तसे ते त्यांच्या शत्रूंचा नाश करतील. त्यांच्या सभोवतीच्या सर्व शत्रूंचा ते नाश करतील. यरुशलेमवासी काळजीमुक्त होतील व आराम करतील.”

जखऱ्या 14:10

तेव्हा यरुशलेमभोवतालचा सर्व प्रदेश अराबाच्या वाळवटासारखा ओसाड होईल. निगेवमधील गेबापासून रिम्मोनपर्यंत पसरलेल्या वाळवंटासारखा तो देश होईल. पण सर्व यरुशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल - अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत (कोपऱ्यावरच्या द्वारापर्यंत) आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत)

Interlinear

Choose Theme