Home Bibles यिर्मया 33:2 · मराठी बायबल
यिर्मया 33:2 · मराठी बायबल

परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली आणि तो तिचे रक्षण करतो, परमेश्वर हेच त्याचे नाव. परमेश्वर म्हणतो,

Cross references

निर्गम 3:14

मग देव मोशेला म्हणाला, “त्याचे नाव ‘जो मी आहे तो मी आहे’असे आहे, हे त्यांना सांग. तू इस्राएल लोकाकंडे जाशील तेव्हा ‘मी आहे’ ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग.

निर्गम 6:3

“मी परमेश्वर आहे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दर्शन दिले; त्यांनी मला ‘एल-शदाय’ असे नाव दिले; त्यांना ‘याव्हे’ (म्हणजे ‘परमेश्वर’) हे माझे नाव माहीत नव्हते.

निर्गम 15:3

परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नांव याव्हे आहे.

स्तोत्रसंहिता 87:5

सियोनात जन्मलेल्या प्रत्येकाला देव ओळखतो. सर्वशक्तिमान देवाने ते नगर बांधले.

स्तोत्रसंहिता 102:16

परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक पुन्हा त्याचे गौरव बघतील.

यशया 14:32

ते सैन्य त्यांच्या देशात निरोप पाठवील. ते जासूद त्यांच्या लोकांना काय सांगतील? ते सांगतील की पलेशेथचा पराभव झाला आहे. पण परमेश्वराने सीयोनला बलवान बनवले व सर्व गरीब तिकडे आश्रयासाठी गेले.

यशया 37:26

“पण देव म्हणतो, “अश्शूरच्या राजा, मी, देवाने फार पूर्वीच हे केले आहे हे तू ऐकलेच असशील. फार वर्षापूर्वी मी अश्शूरला निर्मिले, मीच तुला येथवर आणले. मीच तुला त्या शहरांचा नाश करण्याची परवानगी दिली. माझे काम करून घेण्यासाठी आणि त्या शहरांना दगडधोड्यांच्या राशीत बदलण्यासाठी मी तुझा उपयोग केला.

यशया 42:8

“मी परमेश्वर आहे माझे नाव यहोवा, मी माझे गौरव दुसऱ्यांना देणार नाही. माझ्याकरिता असलेली स्तुती मी मूर्तीच्या (खोट्या देवांच्या) वाट्याला येऊ देणार नाही.

यशया 43:1

याकोब, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएल, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस.

यशया 43:21

ह्या लोकांना मी निर्मिले आहे. ते माझी स्तुतिस्तोत्रे गातील.

यशया 62:7

पृथ्वीवरच्या सर्व लोकांनी स्तुती करण्याइतपत यरूशलेमला परमेश्वर प्रशंसनीय करीपर्यंत तुम्ही त्याची प्रार्थना केली पाहिजे.

यिर्मया 10:16

पण याकोबचा देव त्या मूर्तीसारखा नाही. त्याने सर्व गोष्टींची निर्मिती केली आणि इस्राएलच्या वंशजांची, स्वत:चे खास लोक म्हणून निवड केली. “सर्वशक्तिमान परमेश्वर” हेच देवाचे नाव.

यिर्मया 16:21

परमेश्वर म्हणतो “म्हणून त्या मूर्ती बनविणाऱ्या लोकांना मी धडा शिकवीन. प्रथम मी त्यांना माझ्या शक्तीची व सामर्थ्याची जाणीव करुन देईन. मग त्यांना कळेल की मीच खरा देव, मीच खरा परमेश्वर आहे.”

यिर्मया 32:18

परमेश्वर, तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस. पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस. सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा, तुझे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.

आमोस 9:6

आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या. तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो. तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो. आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो. त्याचे नाव याव्हेआहे.

इब्री लोकांस 11:10

ज्या नगराला मजबूत पाया आहे व ज्याचा प्रयोजक बांधकाम कारागीर स्वत:देव आहे अशा नगराची ते वाट पाहात होते.

इब्री लोकांस 11:16

परंतु ते लोक त्याहून अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गाच्या वतनाची इच्छा धरुन होते. म्हणून देवाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला लाज वाटली नाही. कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.

प्रकटीकरण 21:2

पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर ʊयरुशलेम, वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते.

प्रकटीकरण 21:10

मी आत्म्याने भरुन गेलो असता देवदूत मलाएका उंच पर्वतावर घेऊन गेला. आणि त्याने पवित्र नगर, यरुशलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले.

Interlinear

Choose Theme