Home Bibles स्तोत्रसंहिता 16:2 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 16:2 · मराठी बायबल

मी परमेश्वराला म्हणालो “परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”

Cross references

ईयोब 22:2

“देवाला आपल्या मदतीची गरज आहे का? नाही. अतिशय विद्वान माणसाचा सुध्दा देवाला फारसा उपयोग नाही.

ईयोब 35:7

आणि ईयोब, तू खूप चांगला असलास तरी त्यामुळे देवाला कसली मदत होत नाही. देवाला तुझ्याकडून काहीच मिळत नाही.

स्तोत्रसंहिता 8:1

परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरुन दिला आहे.

स्तोत्रसंहिता 27:8

परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला अगदी माझ्या ह्दयातून तुझ्याशी बोलायचे आहे. परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.

स्तोत्रसंहिता 31:14

परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस.

स्तोत्रसंहिता 50:9

मी तुमच्या घरातून बैल घेणार नाही. मी तुमच्या गोठ्यातून बकऱ्या घेणार नाही.

स्तोत्रसंहिता 73:25

देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार?

स्तोत्रसंहिता 89:26

तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझे वडील आहात तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’

स्तोत्रसंहिता 91:2

मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला, माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”

यशया 26:13

परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. पूर्वी आम्ही इतर भोंदू देवांना अनुसरलो आम्ही त्यांना जवळ केले. पण आता लोकांनी फक्त तुझेच नाव घ्यावे असे आम्हाला वाटते.

यशया 44:5

“एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबचे’ नाव लावील आणखी एक आपली सही ‘मी परमेश्वराचा’ अशी करील, तर आणखी एक स्वत:ला ‘इस्राएल’ म्हणवून घेईल.”

जखऱ्या 13:9

मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.”‘

लूक 17:10

तुमच्या बाबतीतही हे तसेच आहे: जेव्हा तुम्हांला करण्यास सांगितलेली सर्व कामे तुम्ही केल्यावर असे म्हटले पाहिजे, “आम्ही कोणत्याही मानास पात्र नसलेले सेवक आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.”‘

योहान 20:28

थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”

रोमकरांस 11:35

“प्रथम कोणी काही त्याला दिले का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?” ईयोब 41:11

Interlinear

Choose Theme