Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 16:1 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 16:1 · मराठी बायबल

देवा, माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे.

Cross references

स्तोत्रसंहिता 7:1

परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.

स्तोत्रसंहिता 7:2

तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.

स्तोत्रसंहिता 9:10

ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले, तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.

स्तोत्रसंहिता 17:5

मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो. माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.

स्तोत्रसंहिता 17:8

तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर. मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.

स्तोत्रसंहिता 22:8

ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग. कदाचित् तो तुला मदत करेल. तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.”

स्तोत्रसंहिता 25:20

देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करु नकोस.

स्तोत्रसंहिता 31:23

देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो. परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो.

स्तोत्रसंहिता 37:28

परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहात नाही. तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल.

स्तोत्रसंहिता 56:1

देवा, लोकांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून तू माझ्यावर दया कर. ते माझा पाठलाग करीत आहेत आणि रात्रंदिवस माझ्याशी लढत आहेत.

स्तोत्रसंहिता 60:1

देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा त्याग केलास आणि आमचा नाश केलास. कृपाकरुन आमच्याकडे परत ये.

स्तोत्रसंहिता 84:12

सर्वशक्तिमान परमेश्वरा, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात. 13

स्तोत्रसंहिता 97:10

जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो. देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.

स्तोत्रसंहिता 116:6

परमेश्वर असहाय्य लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उध्दार केला.

Interlinear

Choose Theme