Home Bibles स्तोत्रसंहिता 50:9 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 50:9 · मराठी बायबल

मी तुमच्या घरातून बैल घेणार नाही. मी तुमच्या गोठ्यातून बकऱ्या घेणार नाही.

Cross references

स्तोत्रसंहिता 40:7

म्हणून मी म्हणालो “बघ, मी येत आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते.

स्तोत्रसंहिता 69:31

यामुळे देव आनंदित होईल. एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.

यशया 43:23

तू तुझ्या मेंढ्या होमबलि देण्यासाठी माझ्याकडे आणल्या नाहीस तू माझा मान राखला नाहीस. तू मला बळी अर्पण केले नाहीस. मला होमबलि अर्पण करावे म्हणून मी तुला बळजबरी केली नाही. तू तुला वीट येईपर्यंत धूप जाळावा असा आग्रह मी धरला नाही.

मीखा 6:6

परमेश्वराला भेटायला येताना मी काय आणले पाहिजे? स्वर्गातील परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मी काय केले पाहिजे? होमार्पणे व एक वर्षाचे वासरु घेऊन मी परमेश्वरापुढे यावे का?

प्रेषितांचीं कृत्यें 17:25

हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे.

इब्री लोकांस 10:4

कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे शक्य नाही.

Interlinear

Choose Theme