“देवाला आपल्या मदतीची गरज आहे का? नाही. अतिशय विद्वान माणसाचा सुध्दा देवाला फारसा उपयोग नाही.
Cross references
तेव्हा तुमच्या भल्यासाठीच मी आज परमेश्वराचे नियम आणि आज्ञा सांगतो, ते ऐका व पाळा.
आणि दुष्ट लोक म्हणतात, ‘सर्वशक्तिमान देव कोण आहे? आम्हाला त्याची चाकरी करण्याची गरज नाही. त्याची प्रार्थना करण्यात काही अर्थ नाही.’
ईयोब, तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही. तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही.
आणि ईयोब, तू खूप चांगला असलास तरी त्यामुळे देवाला कसली मदत होत नाही. देवाला तुझ्याकडून काहीच मिळत नाही.
मी परमेश्वराला म्हणालो “परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस माझ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली आहे”
ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात.
तुम्ही ज्ञान मिळवण्याचा निश्चय करता तेव्हाच ज्ञानाची सुरुवात होते. म्हणून तुमच्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग करुन ज्ञान मिळवा. म्हणजे तुम्ही ज्ञानी व्हाल.
जर तुम्ही शहाणे होत असाल तर तुमच्या भल्यासाठीच शहाणे होत असता. पण तर तुम्ही गर्विष्ठ झालात आणि दुसऱ्या लोकांची चेष्टा करु लागलात तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांबद्दल तुम्हीच जबाबदार ठरता.
जर तुमच्याजवळ मालमत्ता असेल तर तिच्या जोडीला शहाणपण असणे अधिक चांगले. शहाण्या लोकांनाखरोखरच जास्त संपत्ती मिळते.
जर तुझा उजवा डोळा तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो काढून टाक व फेकून दे, संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एखादा अवयव गमावलेला बरा.
तुमच्या बाबतीतही हे तसेच आहे: जेव्हा तुम्हांला करण्यास सांगितलेली सर्व कामे तुम्ही केल्यावर असे म्हटले पाहिजे, “आम्ही कोणत्याही मानास पात्र नसलेले सेवक आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.”‘
तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल.