Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 146:2 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 146:2 · मराठी बायबल

मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.

Cross references

शास्ते 5:3

राजांनो ऐका, लक्ष द्या अधिपतींनो, मी परमेश्वराचे, इस्राएल लोकांच्या परमेश्वराचे गीत स्वत: गाईन. त्याचे स्तुति स्तोत्र म्हणीन.

स्तोत्रसंहिता 63:4

होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.

स्तोत्रसंहिता 71:14

नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.

स्तोत्रसंहिता 104:33

मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन. मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.

स्तोत्रसंहिता 145:1

देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.

स्तोत्रसंहिता 145:2

मी तुझी रोज स्तुती करतो. तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.

प्रकटीकरण 7:9

यानंतर मी पाहिले, तेव्हा अफाट लोकसमुदाय मला दिसला. तेथे इतके लोक होते की, कोणालाही ते मोजता आले नसते.ते प्रत्येक राष्ट्राचे, वंशाचे, जमातीचे, आणि भाषेचे लोक होते, हे लोक सिंहासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे होते. त्यासर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या होत्या.

Interlinear

Choose Theme