देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
Cross references
देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो.
माझ्या देवा! माझ्या राजा! माझी प्रार्थना ऐक.
परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो. मी तुइयाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस.
परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस. तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.
परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला बरे केलेस.
परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन. अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन. तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल. 13
मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
देवा, तू माझा राजा आहेस आज्ञा द आणि याकोबाच्या माणसांना विजयाप्रत ने.
मी राजासाठी या गोष्टी लिहितो तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरुन जाते. एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात.
देवातुझे सिंहासन नेहमीसाठी आहे. चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे.
देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
देवाचे पवित्र शहर सुंदर आहे. त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे. हे त्या महान राजाचे शहर आहे.
देवा, तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो. तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो.
देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा, देवासाठी रस्ता तयार करा. तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव यादे आहे. त्याच्या नावाची स्तुती करा.
नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.
मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन. मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.
का? कराण परमेश्वर मोठा देव आहे, इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.
परमेश्वराला गाणे गा. त्याच्या नावाचा जयजयकार करा. चांगली बात्तमी सांगा. तो रोज आपला उध्दार करतो ते सांगा.
हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे.
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.
परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.
मी परमेश्वराची स्तुती करेन. प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.
मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या. सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या.
मी म्हणतो, “परमेश्वराने माझे रक्षण केले. म्हणून आम्ही आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात गाऊ व वाद्य वाजवू.”
आता मी नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गातो, त्याचा गौरव करतो, त्याचे उपकार मानतो. तो करतो ती प्रत्येक गोष्ट बरोबरच; असते तो नेहमीच न्याय मार्ग स्वीकारतो आणि गर्विष्ठांना तो नम्र करतो.
काहीजणांजवळ चांगले नर जातीचे पशू आहेत. ते, ते पशू मला यज्ञबली म्हणून अर्पण करु शकतील पण ते तसे करीत नाहीत. काही लोक चांगली जनावरे आणतात. ती मला अर्पण करण्याचे वचनही देतात पण गुपचूप आजारी जनावरांबरोबर त्यांची आदलाबदल करतात, आणि मला रोगी जनावरे अर्पण करतात. अशा लोकांचे वाईट होईल. मी महान राजा आहे. तुम्ही मला मान द्यावा. सर्व जगातील लोक मला मानतात.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
“मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे.
त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे: