Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 118:28 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 118:28 · मराठी बायबल

परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.

Cross references

निर्गम 15:2

परमेश्वर माझे सामर्थ्य आहे. तो माझे रक्षण करितो. मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन;परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.

1 इतिहास 16:14

परमेश्वर आमचा देव आहे. त्याच्या सामर्थ्याची साक्ष सर्वत्र आहे.

स्तोत्रसंहिता 143:10

मी जे करावे असे तुला वाटते ते मला दाखव. तू माझा देव आहेस तुझे चांगले मन आत्मा मला साध्या देशात घेऊन जाऊ दे.

स्तोत्रसंहिता 145:1

देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.

स्तोत्रसंहिता 146:2

मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.

यशया 12:2

देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे. मी निर्भय आहे तो मला तारतो. परमेश्वर हीच माझी शक्तीआहे. तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.

यशया 25:1

प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.

यशया 25:9

तेव्हा लोक म्हणतील, “हा आपला देव आहे. आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा. तो आपले रक्षण करायला आला आहे. आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत, म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.”

Interlinear

Choose Theme