Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 118:29 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 118:29 · मराठी बायबल

परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.

Cross references

एज्रा 3:11

‘देवाची स्तुती करा कारण देव चांगला आहे, तो सर्वकाळ प्रेम करतो’ अशी स्तुतिगीते त्यांनी आळीपाळीनेगयिली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या आणि परमेश्वराची स्तुती केली.

स्तोत्रसंहिता 103:17

परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.

स्तोत्रसंहिता 118:1

परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.

स्तोत्रसंहिता 118:4

परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

यशया 63:7

परमेश्वर कृपाळू आहे ह्याचे मी स्मरण ठेवीन. परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन. इस्राएलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या. परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे. परमेश्वराने आमच्यावर दया केली.

Interlinear

Choose Theme